Marathi Prem Charolya

हे ऐन थंडीतलं ऊन कसलं असून नसल्या सारखं
रुसलेलं माणूस कोणी गालात हसल्या सारखं


अनोळखी हास्य गालातच हसतं
खुळं आपलं मन अगदी अलगद फसतं


आयुष्यात प्रत्येकाचं कोणावर तरी मन जडतं
प्रेम हे असंच अबोल नजरेतून न सांगता घडतं


आजही मन माझे होते खूप उदास, अजून होतो तुझ्या त्या आठवणींचाच आभास
होत नाही आजही विश्वास, खरच तुझ्यात गुंतला आहे माझा श्वास


वाळकी पानं पडतात ना
सोसाट्याचा वारा सुटल्यावर
तशी तुझी स्वप्नं पडत राहतात
कधी चुकून डोळे मिटल्यावर

मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं, पण तरी ते तुलाच शोधत होतं
तुला खरच ओळखता नाही आलं, ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं


कॉलेज काट्याकडे पाहून फक्त एकदाच ती हसली
आणि प्रत्येकालाच वाटलं ती आपल्या जाळ्यात फसली


तारेवरची कसरत मी तारेशिवाय करतो
जरा तोल जातोय असं वाटलं की लगेच तुझा हात धरतो


खुप काही बोलायचय खुप काही ऐकायचय,
उरल-सुरल आयुष्य माझ आनंदात घालवायचय.


रानपाखारांची किलबिल, आजवर कधी कळलीच नाही,
कारण तू सोबत असताना, मी ती कधी ऐकलीच नाही


काल रात्री म्हणे गावात गोंधळ मजला होता
जमिनीवरचा चंद्र पाहून आकाशातील चंद्र लाजला होता


आवडेल मलाही पाऊस व्हायला, न सांगता तुझ्या भेटीला यायला
धुंद होऊन तुझ्यावर बरसायला, केसांमधून पाठीवर हळुवार ओघळायला


मी हि असच लिहावं , तू हि असच वाचाव
माझ्या हृदयातील भाव, तुला शब्दातून कळाव


कधीतरी भेटशील न तेव्हा बोलत जा,
नात्यांच्या तराजूत मलाही तोलत जा


दिवसराञ करतो विचार तुझा, श्वासात दरवळतो गंध तुझा
तुझ्या ओठांवर ओठ टेकण्याचा आहे नवा छंद माझा


आज काल वाटेवरचा मोगराही नेहमीसारखा फुलत नाही
कदाचित त्यालाही समजले असेल की तू माझ्याशी बोलत नाही


Marathi Prem Kavita Charolya

तुझे काय ते तुला माहित माझे प्रेम खरे होते
तुला ओळखता नाही आले मी तर सर्वस्व तुला वाहिले होते


तू स्वतः बद्दल किती महत्त्वाचं सांगून गेलीस
माझ्याबद्दल ऐकायच विसरून गेलीस
माझं हृदय तर घेऊन गेलीसच पण
तुझं मात्र द्यायचं विसरून गेलीस


तिच्या पाणावलेल्या डोळ्यात मला अनेक प्रश्न दिसतात
आणि तेच प्रश्न मला प्रेमरूपी कोड्यात टाकतात


तुझा स्पर्श मला नवीनच जाणवला
कधीतरी सांडून पुन्हा नव्याने गावलेला


मरण असेल तर ते तुझ्या मिठीत असावं
नाहीतर आयुष्य जगणं तुझ्यासोबत असावं


Marathi Charoli On Love


तुझ्या आठवणीत माझ्या कित्येक रात्री जागत गेल्या
आणि त्या सुद्धा मला माझं प्रेम मागत गेल्या


प्रेम करावं डोळसपणे त्यात नको घाई
फसवणूक झालीच तर त्याला ग्राहकमंचच नाही


चेहरा कितीही लपवला तरी डोळे लपवता येत नाही
प्रेम कितीही लपवलं तरी डोळे ते लपवत नाही


प्रेम तुझे जपताना होतोय खूप त्रास
मिटल्या पापणीत का बरे होतोय तुझाच भास


Marathi Prem Charolya

माझ्यापासून तुझ्यापर्यंतच अंतर जवळ वाटलं
तुझ्याकडे धाव घेतली तर ते फार लांब वाटलं


खरी जरी असेल प्रीत तुझी का केली नाही तू व्यक्त
सदा वाट बघण्यात तुझी आटले माझ्या देहाचे रक्त


तू पाहता क्षणी मजला काळजाचे ठोके चुकले
लाजेचा पडदा येता मधे डोळे माझे आपोआप झुकले


खरे प्रेम दूरदर्शन सारखे असत कधीही नं बदलणारं
लोकांनी कितीही शिव्या घातल्या तरी आपल्याच विश्वात रमणार


प्रेम म्हणजे काय असतं? सागरात पडल्यावरही घाबरायचं नसतं
कितीही पोहता येत असलं तरीही आकंठ बुडून जायचं असतं


Charoli in Marathi on Love


दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित उन पडतं
तसंच काहीसं पाऊल नं वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम येतं


आज तू पुन्हा प्रेमाची जाणीव करून दिलीस
जे कधी माझ्या नशिबातून हरवले होते
आज तेच प्रेम तू सावरून घेऊन आलीस


झपाटलं आता मनाला भिनलंय प्रेमाचं वारं
बघा पाणीही गोड झालं अरबी समुद्राचं सारं
वाट बघाया लागलो उघडून दही दारं
माझा मी नं उरलो आता तुज देऊन टाकलं सारं


वाहणाऱ्या मनाला थांबवणारं
भरकटलेल्या जीवनाला दिशा देणारं
कोणीतरी आपलं असावं


डोळ्यातल्या स्वप्नाला कधी प्रत्येक्षातही आण
किती प्रेम करतो तुझ्यावर हे नं सांगताही जाण


Marathi Charolya On Love

जेव्हा देशावरचे स्पर्श मनापर्यंत पोहोचतात
मला वाटतं तेव्हा कवितेचे नावे शब्द सुचतात


तो म्हणायचा लगेच जायचं असेल तर येऊच नकोस
आणि ती मनात म्हणायची जायला निघाले तरी मला जाऊ देऊच नकोस


माझाच वाद असे माझ्याशी तुला काळजी नाही कशाची
मी बसलो एकटा जरी तू मात्र कधी दूर नसायची


का करतेस विचार ग सखे वावटळीने भरलेल्या भूतकाळाचा
ढळून आनंदाचे अश्रू तू स्वीकार कर नव्या जीवनाचा


निरर्थक गोष्टींवरून तुझं माझं भांडण व्हायचंच
आयुष्य मात्र सगळं विसरून पुन्हा एकत्र होऊन जगायचं


चंद्राच्या रूपात मला तुझं मनमोहक रूप दिसावं
माझं मन त्यात मग तुकडा तुकडा फसावं


Marathi Charolya Premachya


वाट तुझी बघत असतं रोजच कुणीतरी
तुझ्यासाठी जगत असतं आस लावून प्रत्येक क्षणी


तू जवळ नसल्यावर वाटतं तुझ्यासोबत खूप काही बोलावसं
पण तू समोर येताच फक्त तुला पाहावंसं वाटतं


तुझ्या नुसत्या भासाने श्वास सुसाट धावतात माझे
मनी फक्त आस तुझी जवळ आठवणींचे ओझे


तू नुसतं मला पाहिलंस तरी चेहऱ्यावर किती हसू उमटलं
दोन शब्दच नुसतं बोललीस तरी मनात पुन्हा प्रेम दाटलं


तू समोर असलीस की मला काहीच सुचत नाही
तुझ्याशिवाय जगण्याची कल्पनाच मला रुचत नाही


 

Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *