Marathi Love Jokes

गर्लफ्रेंडचे वडील: पगार किती तुला?
मन्या : १६०००
गर्लफ्रेंडचे वडील : माझ्या मुलीला मी १५००० पॉकेट मनी देतो
मन्या : तेच धरुन १६०००


मुलगी : पावसाचे थेंब पाहिल्यावर तुझी आठवण येते …
ओल्या केसांना हात लावल्यावर तुझी आठवण येते …
श्रावणाची चाहूल लागल्यावर तुझी आठवण येते…
मुलगा : हो माहित आहे, तुझी छत्री माझ्याकडे आहे. देतो उद्या


मुलगा आणि मुलगी बागेत बसलेले असतात
मुलगी : जानु असे काही बोल कि माझे काळीज धक धक करेल
मुलगा : पळ पळ तुझा बाप आला


एखादी‬ पोरगी जवळ येतानी दिसली कि काही पोरं खिशातला ‪ ‎मोबाइल‬ बाहेर काढतात ‪ ‎पण‬ करत काही नाही
‪बस‬ पॅटर्न लॉक खोलतात आणि wallpaper पाहुन परत मोबाईल लॉक करुन खिशात ठेवतात….
‎काय‬ फॅशन आहे राव

 


Marathi Funny Jokes for Girlfriend


 

 

एक मुलगा एका मुलीवर प्रेम करत असतो. तो तिला प्रेमपत्र लिहितो व तिचं प्रेम असेल तर दुसऱ्या दिवशी लाल रंगाचा ड्रेस घालून यायला सांगतो.
ते प्रेमपत्र तो एका पुस्तकात टाकून ते पुस्तक तिला देतो.
दुसऱ्या दिवशी ती पिवळ्या रंगाचा ड्रेस घालून येते व त्याच पुस्तक त्याला परत करते. तो मुलगा ऊदास राहू लागतो. नंतर तिचं लग्न होतं. काही दिवसांनी ते पुस्तक खाली पडत व त्यातून एक चीठ्ठी पडते. त्या चीठ्ठीत तिने लीहीलेल असतं – माझं तुझ्यावर प्रेम आहे. घरच्यांना येऊन भेट. माझ्याकडे लाल रंगाचा ड्रेस नाही.
वाचून मुलगा आपल्या कपाऴावर हात मारुन घेतो.
तात्पर्य : वर्षातून किमान एकदातरी अभ्यासाचे पुस्तक ऊघडून पहावे अन्यथा “ती सध्या काय करते?” म्हणायची वेळ येते


तिने प्रपोज नाकारल्यावर त्याने रागातच शपथ घेतली
एक दिवस मी पोरींना माझ्या इशार्‍यावर नाचवीन
आणि पुढे जाऊन तो DJ वाला बनला


ती मला सोडून गेल्यानंतर मी मरणारच होतो पण मग मला आठवल की तिच्या मैत्रिणीचा पण नंबर आहे माझ्याकडे
मग जीवात जिव आला आणि तिच्यात जीव रंगला


Girlfriend : माझा सोन्या, झोपलास का रे?
रिप्लाय : हो
Girlfriend : मग रिप्लाय कसा दिलास रे सोन्या?
रिप्लाय : मी सोन्याचा बाप बोलतोय. सुनबाई झोपा आता. उद्या बारावीचा पेपर आहे सोन्याचा

 


Marathi Jokes Love


 

 

पिंट्या :मला आपल्या आयटमला कायतरी शॉलेट गिफ्ट द्यायचंय.
बंड्या: मग सोन्याची रिंग दे की
पिंट्या: ह्या, हे असलं बारीक काय नको….. एकदम मोठा कायतरी द्यायचंय.
बंड्या: मग MRF चा टायर दे कानात घालायला


तिला पटवण्यासाठी DJ Operating शिकलो आणि पहिली DJ ची ऑर्डर तिच्या लग्नाचीच मिळाली. वरून म्हणते कशी “आवाज वाढावं DJ तुला Item ची शपथ हाय”


मुलगी दुकानदाराला : काका असं Valentines Day कार्ड आहे का ज्यात लिहिलंय ‘तू माझे पहिले आणि शेवटचे प्रेम आहेस’
दुकानदार : हो, आहे की
मुलगी : बरं, पाच द्या मग


Boyfriend : आज मी तुझ्या घरी गेलेलो, मला वाटत नाही आपले लग्न होईल म्हणून…
Girlfriend : का रे, काय झालं तू माझ्या आईला भेटलास का?
Boyfriend : नाही तुझ्या बहिणीला भेटलो, आयला काय जबरदस्त दिसते ती


ब्रेकअप नंतर मुलाने केलेले हृदयस्पर्शी वाक्य – तू मला सोडून गेलीस याचं मला दुःख नाही पण…. परत येऊन माझी दुसरी सेटिंग बिघडवलीस तर लय मार खाशील


पंकज : तेरे लिये दुनिया छोड दि है
Girlfriend : गायछाप सुटली का रे तुला खुळ्या, दुनिया सोडायला निघालास


पिंट्या : मला आपल्या आयटमला कायतरी सॉलिड गिफ्ट द्यायचंय
बंड्या : मग सोन्याची रिंग दे की
पिंट्या: हे असलं बारीक काय नको, एकदम मोठा कायतरी द्यायचंय
बंड्या : मग MRF चा टायर दे कानात घालायला

 


Marathi Romantic Jokes


 

नदी किनारी जोडपे बसलेलेे असते
GF : तुझा काय प्लॅन आहे
BF : तोच गं, २५ पैसा १ मिनीट
GF : मर मेल्या मोबाईल मधेच


एकदा मी माझ्या हृदयाला विचारलं, “प्रेम काय आहे???”
हृदयाने क्षणाचाही विलंब न करता पटकन संगितले, “हे बघ, माझं काम आहे रक्तप्रवाह पाहणं. हे अभ्यासक्रमा बाहेर चे प्रश्न मला नको विचारू”


Boyfriend : बेबी
Girlfriend : हा जानू
Boyfriend : तू नेहमी माझ्या सोबत होतीस… जेव्हा माझा भयंकर अपघात झाला तेव्हा, जेव्हा मला पाचव्या सेमिस्टर मध्ये ३ विषयात ० मार्क मिळाले तेव्हा… जेव्हा मला किडनी स्टोन झाला तेव्हा पण, आणि जेव्हा मला बाबांनी रागात घरातून बाहेर काढले तेव्हा पण…
Girlfriend : माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे जानू आणि यापुढेही मी नेहमी तुझ्या सोबत असणार आहे
Boyfriend : अगं नको ग… बस झालं आता… मला वाटतं तूच पानवती आहेस.


खतरनाक प्रपोज
तू माझी नसली तरी मी तुझा आहे. कारण तू भारतात आहे आणि भारत माझा देश आहे. विषय संपला. जय हिंद
खतरनाक उत्तर
तू जरी मला बहीण मानत नसला तरी मी तुझी बहीण आहे. कारण तू भारतात आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. विषय संपला. जय हिंद भावा

 


Marathi Jokes for Girlfriend


 

मुलगी : हाय, तुझी आठवण येते
मुलगा : आजून पगार झाला नाही
मुलगी : अच्छा चाल बाय


Boyfriend : प्रिये, तू कधीच डोळ्यात पाणी साठवू नकोस
Girlfriend : (लाजून) का रे?
Boyfriend : कारण साठलेल्या पाण्यात डेंग्यूचे डास अंडी घालतात


गर्लफ्रेंड तिच्या बॉयफ्रेंडला फोन लावते
GF : जानू, कुठे आहेस रे?
BF : मी बँकेत आहे
GF : अरे मग येताना १०,००० रुपये घेऊन ये ना, नवीन मोबाईल घ्यायचा आहे मला
BF : अगं मी ब्लड बँकेत आहे, रक्त आणू का रक्त

 


GF BF Jokes in Marathi


 

मुलगा गर्लफ्रेंडशी व्हॉटसअॅपवर गप्पा मारत होता.
मुलगा : प्रिये, झोपली असशील तर स्वप्नं पाठव, जागी असलीस तर आठवणी पाठव, हसत असलीस तर खुशी पाठव, रडत असलीस तर अश्रू पाठव.
मुलीचा रिप्लाय आला, “अरे, भांडी घासतेय रे, खरकटं पाठवू का?”


गाण्याच्या Girlfriend ने त्याला पात्र लिहिले, “माझ्या जीवनात एक नवा मुलगा आला आहे, तो चांगला आहे आणि मी त्याच्याशी लग्न करणार आहे. मी तुला दिलेला माझा फोटो मला परत दे”
गाण्याने आपल्या सगळ्या मित्रांच्या गर्लफ्रेंडचे फोटो केले आणि आणि त्यामध्ये तिचा ही फोटो ठेऊन तिला पात्र लिहिले, “या फोटो मधून तुझा फोटो काढून बाकीचे परत पाठव. तुझा चेहरा मला आठवत नाहीये”


“आता फुलंच गुलाबाचं आवडलंय म्हटल्यावर काटे तर टोचणारच ना!”
असं Status दिसलं की समजून जायचं “आपल्या भाऊला तिच्या घरच्यांनी तुडव तुडव तुडवलाय”

 


Love Jokes Marathi


 

मी तीला 3 4 वेळा फोन केला पण तिने उचलला नाही
नंतर तिला एकच MESSAGE केला “तुझ्या मोबाईल मध्ये बॅलेन्स आला का? ५०० चा रिचार्ज केलाय”
तिने आत्तापर्यंत 20 वेळा फोन केला पण मी उचलला नाही.
चुकीला माफी नाही


मी बारावीला असताना तिला प्रपोज केला होता. ती म्हणाली, “नाही मी तशी मुलगी नाही… मला आजून खूप शिकायचंय… खूप मोठं व्हायचंय… मला अगोदर माझं करिअर घडवायचंय माझी ध्येय खूप मोठी आहेत..”
काल भेटली… डी-मार्ट मध्ये, मला बोलली… सर सामानासोबत पिशवी देऊ का? एक्स्ट्रा ५ रुपये लागतील


प्रेम तर तिच्यावर तेव्हाच झाले होते जेव्हा मराठी शाळेत २६ जानेवारीला शाळेतून प्रभातफेरी निघाली आणि ती जोरात ओरडली –
“सर, हा हात धरून चालत नाहीये”


मंगेश : ( आपल्या GF ला ) आज तु म्हणशील तेथे आपण भिरायला जाऊ.
सोनू : अय्या खरचं…. मग आज आपण शाँपिंगला जाऊया?
मंगेश : अरे वेडी रे वेडी, मी तर तुझी गंम्मत करत होतो!

 


Marathi GF BF Funny Jokes


 

पक्या’ बस मधे उभा होता, अचानक “ब्रेक’ लागल्यामुळे समोरच्या मुलीवर’ जाउन पङला..
मुलगी : “नालायका, काय करतोस..?
पक्या : ‘ङिप्लोेमा’ तु काय करतेस..


जर एखादा मुलगा तुम्हाला सारखा कॉल करून ञास देत असेल तर ??
त्याचा नंबर OLX वर टाकुन जाहिरात (Ads) द्या… “iPhone 5” फक्त ५००० रूपयां मध्ये
आई शप्पथ सांगतो.. जेवढे कॉल त्याने तुम्हाला केले नसतील त्यापेक्षा जास्त त्याला येतील..


गण्या – मैत्री करणार काय ?.
चिंगी – माझे पप्पा परवानगी देणार नाही..
गण्या – वा लय भारी, जसे माझ्या पप्पा ने मला प्रेम करायचे लायसन काढून दिलाय.

 


Romantic Jokes Marathi


 

मुलगी तिच्या बेस्ट मित्राला मिठी मारून बोलू शकते की “मी माझ्या प्रियकराला खूप मिस करते”
पण ती बॉयफ्रेंड ला मिठी मारून हे नाही बोलू शकत की “मी माझ्या मित्राला खूप मिस करते”
कारण प्रेमापेक्षा जास्त निष्ठावंत एकनिष्ठता ही मैत्रीत असते


Girlfriend : तू सिगरेट नको ओढू, मला खूप त्रास होतो
Boyfriend ने सिगरेट पिणे सोडले.
Girlfriend : तू पान खाणे सोडून दे, तुला तेशोभत नाही
Boyfriend ने पान खाणे सोडले. .
Girlfriend : तू गुटखा खाणे सोडून दे, दात खराब होतात
Boyfriend ने गुटखा खाणे सोडून दिले.
Girlfriend : तू बाईक सावकाश चालवत जा, अॅक्सिडेंट होईल
Boyfriend ने बाईक सावकाश चालवायला सुरुवात केली.
Girlfriend : तू दाढी करत जा, तुला दाढी शोभत नाही
Boyfriend ने दाढी करणे सुरू केले. काही दिवसांनंतर.…
Girlfriend : मला नाही तुझ्यासोबत राहायच, तू खूप बदललास!


एका लग्नात गण्या एका सुंदर मुलीला म्हणतो : तुम्हाला माहीत आहे का,तुम्ही माझ्या पहिल्या बायको सारख्या दिसता
मुलगी : तुमच्या किती बायका आहेत?
गण्या : एकपण नाही.


गण्या : अरे ती समोरची मुलगी माझ्याकडे पाहुन हसली
नाम्या : त्यात काय विषेश, मी पण तुला पहील्यांदा पाहीलं तेव्हा दोन दिवस हसत होतो


BF : प्रिये तुझी आठवण आली, की तुझा फोटो समोर घेऊन तुला बघत राहतो
GF : मग माझ्या आवाजाची आठवण आली तर काय करतोस ?
BF : मग काय एखाद्या कुत्रिला दगड मारतो…

 


Marathi Jokes Shayari


 

Liked it? Share with your friends...

2 thoughts on “Marathi Love Jokes

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *