Marathi Jokes on Facebook

९० किलोची पोरगी राव आणि Facebook वर नाव काय तर “Little Angle”
अगं देवाला घाबर जरा, कुठे फेडशील हे पाप पोरी…


मन्या : बाबा, तुम्हाला एक सांगायचं होतं
बाबा : बोल ना
मन्या : पण तुम्ही रागावणार नाही ना
बाबा : नाटक करू नकोस. पटकन सांग काय ते
मन्या : Facebook वर माझी दहा खोटी अकाउंट्स आहेत
बाबा : हू… पण तू हे मला का सांगतोस?
मन्या : गेल्या दहा दिवसांपासून तुम्ही ज्या गंगुबाईला पार्कमध्ये बोलावताय ना ती मीच आहे
जाम म्हणजे जाम  धुतला बाबांनी मन्याला


Facebook पेज ऍडमिन : आई मी दिसायला कसा आहे ग?
आई : तुझ्या गर्लफ्रेंडला विचार
Facebook पेज ऍडमिन : मला गर्लफ्रेंड नाहीये
आई : मग समजून जा ना काळ्या

 


Facebook Marathi Jokes


 

पूर्वी बिरबलाने तीन प्रश्नांचं एकच उत्तर दिल होत. “पानं का कुजतात?, भाकरी का करपते? आणि घोडा का अडतो?”
एका वाक्यात याचं उत्तर होतं “न फिरवल्या मुळे”
आता असेच तीन प्रश्न आहेत – “दूध का उतू जाते?, पाणी का वाहून जाते?, भाजी का करपते?”
याचही एका वाक्यात उत्तर आहे – “Facebook सुरु असल्यामुळे”


Facebook वर मुलींचा आवडता छंद कोणता ???
फ्रेंड रिक्वेस्ट जमा करून त्यांचे लोणचे घालणे


जीवनातील एक कटू सत्य : तुम्ही शिकून स्वत:च्या पायावर उभे राहीपर्यंत तुमच्या वर्गातील मुलींची मुले चालायला लागली असतात

 


Marathi Jokes FB


 

आम्ही शाळेत असताना Facebook असतं तर आमचं स्टेटस असतं –
“आजपण वर्गाबाहेर”


 

Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *