एक आंधळा माणूस मंदिरात गेला. मंदिरात दर्शन घेत असलेले लोक त्याला बघून म्हणाले, दर्शनाला आलाय देवाला बघु शकणार का? आंधळा म्हणाला, काय फरक पडतोय माझा देव तर मला पाहतोय ना.. “दृष्टी नाही तर दृष्टीकोन चांगला पाहिजे”
माणसाला चमकायचंच असेल तर त्याला स्वतःचाच प्रकाश आणि
झळकायचे असेल तर स्वतःचेच तेज निर्माण करता आले पाहिजे
आयुष्याचा पट हा बुद्धिबळासारखा असतो
इथे प्रत्येक जण अगोदर तुम्हाला खेळ शिकवतो
अन् एकदा तुम्ही या खेळात पारंगत झाला की
प्रत्येकजण तुम्हाला हरविण्यासाठी खेळतो
Motivational Messages in Marathi
समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.
झाडावर बसलेला पक्षी फांदी हल्ल्या नंतरही घाबरत नाही
कारण त्याचा फांदीवर नाही तर स्वतःच्या पंखावर विश्वास असतो
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ
लोकांच्या अंगात देवी,भुतच का येतात??
शिवाजी महाराज, सम्राट अशोक, सावित्री बाई फुले, न्युटन
यांच्यासारखे विचारवंत का येत नाहीत?
जेव्हा विचारवंत अंगात येतील तेव्हा भारत जगावर राज्य करेल
Inspirational SMS in Marathi
ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही
जीवनात एकदा ध्येय निर्धारित केल्यानंतर पुन्हा मागे वळुन पाहू नका,
कारण पुन्हा पुन्हा मागे वळुन पाहणारे इतिहास घडवीत नसतात.
मनुष्य कितीही गोरा असला तरी त्याची सावली मात्र काळीच असते
“मी” श्रेष्ठ आहे हा आत्मविश्वास आहे. पण. फक्त “मीच” श्रेष्ठ आहे हा अहंकार आहे
Motivational MSG in Marathi
आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन.
चुका सुधारण्यासाठी ज्याची स्वत:शीच लढाई असते त्याला कोणीच हरवू शकत नाही.
तुमच्याकडे बघून भूंकणा-या प्रत्येक कुत्र्याकड़े लक्ष देत बसलात
तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहचु शकणार नाही.
Motivational SMS in Marathi for Success
जीवनातील सगळ्याच समस्या देवाच्या भरवशावर सोडून चालत नाही
कुणास ठाऊक त्या समस्या सोडवण्याकरिता देव तुमच्या भरवशावर बसला असेल
कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.
जे आजवर तुमच्याकडे काहीच नव्हतं अस काही तुम्हाला हवे आहे
मग आजवर जे काहीच केले नाही अस काही तरी करण्याची तयारी ठेवा.
GM Inspiration MSG in Marathi
ज्या पायरीचा सहारा घेऊन आपण पुढची पायरी घाठ्ली आहे,
त्या पायरीला कधीच विसरू नये. कारण त्या पायरीचा आधार
घेतला नसता तर आपण पुढची पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो
जो तुमच्या प्रगतीवर जळतो त्याच्या तिरस्कार कधीच करू नका,
कारण तो स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असतो
जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढाच करा
चुकेल तेव्हा माफी मग अन कुणी चुकलं तर माफ करा
घडून गेलेल्या गोष्टीचे दुःख करुन आपण आपल्यालाच ञास देतो
गेलेल्या गोष्टीकडे पहात राहण्यापेक्षा पुढील मार्ग पहावा
कदाचित परमेश्वराने आपल्याला यासाठीच
डोळे मागे न देता पुढे दिले आहेत
Motivational SMS Marathi
मी हरलो म्हणू नकोस, याचवेळी हरलोय म्हण, पुन्हा जग जिंकण्यासाठी येतील कितीतरी क्षण
एकटा उरलो म्हणू नकोस, सध्या एकटा आहे म्हण, आयुष्य संपले नाही अजून भेटतील कितीतरी जन
मी थकलो म्हणू नकोस, जरा दम घेतोय म्हण, पुन्हा झेप घेण्यासाठी पेटून उठेल एकेक कण
ज्योतीचा वापर योग्य केला तर अनेकांचे आयुष्यं उजळते
पण याच ज्योतीला अहंकाराचा वारा लागला तर वनवा पेटतो
जो चांगल्या वृक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते
म्हणून नेहमी चांगल्या व्यक्तींच्या सहवासात राहणे योग्य
आयुष्य जर तुम्हाला मागे खेचत असेल तर तुम्ही नक्कीच खूप पुढे जाणार आहात
कारण घानुष्याचा बाण लांब जाण्यासाठी आधी मागेच खेचावा लागतो
Marathi Motivational Text Messages
जर तुम्ही पाहिलेले स्वप्न पूर्ण नसतील होत तर
तुमच्या कामाची पद्धत बदला, तुमचे तत्व नाही
कारण झाडं नेहमी आपली पानं बदलतात मुळ नाही
जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय
कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही
स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे रहावे लागते
Inspirational MSG in Marathi
जीवन हे हार्मोनियम सारखे असते.
सुखाच्या पट्टया पांढऱ्या, दु:खाच्या पट्टया काळ्या
पण गमंत म्हणजे दोन्ही एकत्र वाजवल्याशिवाय
सुरेल जीवन संगीत निर्माणचं होत नाही
3 thoughts on “Motivational SMS in Marathi”
Very nice. . . !
BesT smS
Awesome…