Funny Jokes in Marathi

सिनेमाच्या इंटर्व्हल नंतर अंधारात आपल्या सीटवर परत जात असलेल्या काकूंनी, सुरुवातीच्या सीटवर बसलेल्याला आस्थेने विचारले, “का हो..! मी बाहेर जाताना माझा पाय कोणाच्या तरी पायावर पडल्याने जे कळवळले… ते तुम्हीच का?”

रागाने लालबुंद झालेला तो : 😡 हो.. मग काय, आत्ता साॅरी म्हणणार आहात का?

काकू :- “सॉरी..? नाही हो.. (मागे वळून पाहत नवऱ्याला) या हो…. बरोबर आहे, हीच लाईन ..!


मॉडर्न लेडी – खुप छान फेशियल केलंस हा आणि क्लीनअप पण किती वर्षाचा अनुभव आहे तुला?

मुलगी – मॅडम माझा ब्युटीपार्लर मधला पहिलाच दिवस, काल पर्यंत मी भांडी घासायचं काम करायचे


कोणतरी सांगून गेलय.. “उम्र को हराना हैं, तो शौक जिंदा रखो”

आम्ही शौक सांभाळलेत तर म्हणतात, “मेल्याच वय झाला तरी अजून सुधारत नाय”


टॅक्सीत मागच्या सीट वर बसलेल्या प्रवाश्याने टॅक्सी ड्रायव्हरशी बोलण्यासाठी त्याच्या खांद्याला हळूच स्पर्श केला.

पण टॅक्सी ड्रायव्हर एवढा दचकला की त्याचा टॅक्सीवरचा कंट्रोल सूटला व गाडी रस्ता सोडून खड्ड्यात जाऊन पडली…

नशिबाने ड्रायव्हर आणि प्रवासी दोन्ही सुखरूप बाहेर पडले..

तितक्यात तो प्रवासी म्हणाला, “साॅरी तुम्ही एवढे दचकाल असं वाटलं नव्हतं”

टॅक्सी ड्रायव्हर म्हणाला, “तुमची काहीच चूक नाही हो, खरं तर माझा आज टॅक्सी चालवण्याचा पहिला दिवस आहे..

गेली पंचवीस वर्ष मी शव 👻 वाहिका चालवत होतो


या ”संतुर” साबणाच्या कंपनिला कोणीतरी समजावून सांगा रे एवढी हळद आणि चंदन टाकु नका म्हणुन
लाईन पोरीवर मारावी की तिच्या मम्मिवर हेच कळत नाही

 


Funny Marathi Jokes


 

ऊन्हाचा कहर इतका आहे कि, सकाळी सानिया मिर्झा बनून बाहेर पडलेल्या पोरी घरी परतताना सेरेना विल्यम्स दिसायला लागतात


भारतात बिस्किट उत्पादन करणाऱ्या दोन प्रसिद्ध कंपन्या आहेत
१. मारी गोल्ड आणि
२. पारले जी
एक कपात जात नाही आणि दुसरं कपात गेलं तर परत येत नाही.


दारुड्या : डॉक्टरसाहेब, तुम्ही माझी दारू सोडवू शकता का?
डॉक्टर : हो, हो, नक्कीच. आजपर्यंत मी अनेकांची सोडवली आहे
दारुड्या : पोलिसांनी माझ्या ४ बाटल्या पकडल्यात. प्लिज सोडवून आणा ना

 


Marathi Vinodi Jokes


 

साखरपुडा आणि लग्न या मधे जर खुप दिवसाचं अंतर असेल तर याचा फायदा कोणाला होतो??
मुलाला?
चूक
मग.. मुलीला ?
नाही, पुन्हा चूक
मग कुणाला?
मोबाईल कंपन्यांना


एक डॉक्टर पेशंटच्या मागे धावत असतो. रस्त्यात एक माणूस विचारतो, “काय झाले डॉक्टर, का धावताय त्याच्यापाठी?”
डॉक्टर सांगतात, “दरवेळी हा मेंदूचं ओप्रेशन करायला येतो आणि केस कापून झाल्यावर पळून जातो”


वर्गात मराठीचा तास सुरु होता. प्राध्यापक शब्दसांगे शिकवत होते. त्यांनी एका विद्यार्थ्याला विचारले, “कविता आणि निबंध यातला फरक काय?”
विद्यार्थी म्हणाला, “प्रेयसी एक शब्द बोलली तरी ती कविता असते आणि बायकोचा एकाच शब्द म्हणजे निबंध”

 


Vinodi Jokes


 

एका अपघाता नंतर पुरुष ड्रायव्हर रागारागाने म्हणाला : तुम्हाला मी हेडलाईट अॉन करून, मला आधी जाऊ देण्याबाबत इशारा दिला होता ना?
स्त्री ड्रायव्हर : ओ मीस्टर, मी सुद्धा ताबडतोब गाडीचे वायपर्स चालु करुन “नाही- नाही” म्हणुन म्हटले होते
ड्रायव्हर फिट येउन पडला ना राव


भारता मधील 8 प्रकार चे शाकाहारी लोक
१.शुद्ध शाकाहारी.
२.अंड खातो पण चिकन नाहीं खात.
३.अंड्याचा केक खातो पण आमलेट नाहीं खात.
४.तर्री खातो पण चिकन पीस नाही खात.
५. बाहेर खातो पण आमच्या घरी बनवत नाही.
६. फक्त पिताना खातो बाकी वेळेस नाही.
आणि सगळ्यात वरचढ
७. खाताना माळ काढुन ठेवतो..


आठ-नऊ जुगारी खेळत होते , तितक्यात पोलिस आले. एक जुगारी पळतच पोलिसांच्या गाडीत जाऊन बसला.
पोलिस : आम्ही तुला पकडण्याआधीच तू गाडीत का बसलास?
जुगारी : तुम्ही मागच्या वेळेस पकडलं होतं तेव्हा उभं राहुन जावं लागलं होतं

 


Comedy Jokes in Marathi


 

जीवनात एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या डोळ्यात अश्रू आले तर हजार जण पुसायला येतील
पण सर्दी झाली तर… एकही नाक पुसायला येणार नाही.
तब्येतीची काळजी घ्या.. थंडी सुरु झाली आहे


मन्या : मुली सासरी जाताना का बरं रडतात?
मुलगी : जर तुला कोणी घरापासून लांब घेऊन जाऊन झाडू-पोछा, खरकटी भांडी धुवायला लावणार, जेवण बनवायला लावणार असेल तर तू काय नाचशील?


बारावी नंतर ग्रॅजुएशन करणे तितकेच महत्वाचे असते जितके मेल्यानंतर तेरावे करणे महत्वाचे असते
होत काहीच नाही, फक्त आत्म्याला शांती मिळते

 


मराठी Vinodi Jokes


 

मुलगी : तू काय काम करतोस?
मुलगा : Actually I was working for Times of India in Mumbai… पण नुकताच जॉब सोडलाय
मुलगी : का?
मुलगा : कोण एवढ्या थंडीत पेपर टाकायला जाणार?


मी एकदा चिमणी पाळली पण काही दिवसांनी ती उडून गेली. मग मी खारूताई पाळली पण काही दिवसांनी तीही पळून गेली.
मग मी एक झाड लावले, चिमणी आणि खारूताई परत आल्या. (डॉ. ए. पी. जे. अब्दुल )
माझा अनुभव पण असाच आहे
मी चिवड़ा आणला… मित्रांनी खाल्ला आणि ते पळून गेले
मी चकली आणली….. मित्रांनी खाल्ली आणि ते पळून गेले
मग मी दारु आणली….. मग माझे मित्र चिवड़ा आणि चकली घेऊन परत आले


भारता मधील ८ प्रकार चे शाकाहारी लोक
१. शुद्ध शाकाहारी
२. अंड खातो पण चिकन नाहीं खात
३. अंड्याचा केक खातो पण आमलेट नाहीं खात
४. तर्री खातो पण चिकन पीस नाही खात
५. बाहेर खातो पण आमच्या घरी बनवत नाही
६. फक्त पिताना खातो बाकी वेळेस नाही
७. खाताना माळ काढुन ठेवतो

 


Marathi Funny Jokes


 

दोन मित्र रिजल्ट लगल्यानंतर
गण्या – किती subjects उडाले?
मन्या – 4 उडाले
पण वाघ चार पावले मागे सरतो ते पुढे मोठी उडी मारण्यासाठी
गण्या – व्हय रे ते बी खरंच हाय
मन्या – तुझे किती उडाले रे
गण्या -काय नाय आमचा वाघ मागे सरता सरता पार खड्ड्यात पडला राव


एकदा ना. सी. फडके अत्र्यांना म्हणाले की वाक्यात स्वल्पविरामाचा नक्की उपयोग काय?
त्यावर ते म्हणाले, योग्य वेळ आल्यावर मी सांगीन, त्यानंतर फडके यांच्या पत्नीला अत्रे भेटले असता,
अत्रे म्हणाले, ” मी तुझा नवरा तू माझी बायको आपण सिनेमाला जाऊ.”
ही गोष्ट लगेचच सौ. फडकेंनी श्री. फडक्यांच्या कानावर घातली.
त्यांनी अत्र्यांकडे याबाबत विषय काढला, तेंव्हा अत्र्यांनी स्पष्टिकरण दिले,
“मी, तुझा नवरा, तू, माझी बायको आपण सिनेमाला जाऊ.”


खतरनाक हिंदी
हिंदी माणूस : कल शाम आपने क्या किया?
मराठी माणूस : पोहे
हिंदी माणूस : अरे वा! हमे भी खिलाओ कभी पोहे तो हमें भी बहुत पसंद है
मराठी माणूस : अरे बाबा, वो वाले पोहे नहीं. कल हम स्विमिंग पुल में पोहे. पहेले पानी में “शिरा” और बादमें पोहा. इतना आनंद आया की उसको कुछ “उपमा” च नही

 


Funny Joke in Marathi Language


 

मार्टिन ल्युथर किंगने सांगितले –
“तुम्ही उडू शकत नसाल तर पळा, पळू शकत नसाल तर चाला
चालू शकत नसाल तर रांगा, पण पुढे सरकत राहा.”
तेव्हा एकाने तोंडात असलेली तंबाखू थुंकून विचारले,
“तसं न्हवं पन एवढी वडातान करून जायाचं कुठं?”


कर्मचारी : साहेब, माझी बायको माझ्याबरोबर ५-६ दिवसांसाठी बाहेर फिरायला जायचे असे म्हणतेय, सुट्टी पाहिजे मला.
साहेब : नाही मिळणार सुट्टी
कर्मचारी : Thank You साहेब. मला माहित होते संकटात तुम्हीच मला मदत कराल म्हणून


मन्या : जर मी या नारळाच्या झाडावर चढलो तर मला Engineering कॉलेजच्या मुली दिसतील का रे?
गण्या : हो .. आणि जर हात सुटला तर Medical कॉलेज च्या पण दिसतील

 


विनोदी जोक्स मराठी


 

मुलगी : Hi
मी : Yes!
मुलगी : How r u ??
मी : Fine
मुलगी : Where R U From?
मी : Dombivli
मुलगी : तूझ शिक्षण किती झालं आहे ??
मी : तुझ्या एवढं
मुलगी : माझ्या एवढं म्हणजे??
मी : मी पन एवढच इंग्लिश बोलून डायरेक मराठीत सुरू होतो


परीक्षा संपली म्हणून सुट्टी मध्ये मनोज गावी गेला.
गावातली एक म्हातारी : काय शिकतोयस रे मनोज??
मनोज : Engineering करतोय आजी
म्हातारी:- का रे, B. Ed. ला नंबर लागला नाही का?


मन्या रागाच्या भरात डॉक्टर कडे गेला
मन्या : माझ्या वरच्या दातात किडा होता मग तुम्ही खालचा दात का काढला?
डॉक्टर : तो कीडा तुमच्या खालच्या दातावर उभा राहुन वरचा दात कोरत होता. आता बघु कुठे उभा राहतो ते


बंड्या : बाबा, मला गाडी घेऊन द्या.
वडील : देवानं दोन पाय कशाला दिलेत?
बंड्या : एक किक् मारायला आणि दुसरा गिअर बदलायला
बाबंनी लय हानला बंड्याला


एक मुलगी वाहन परवाना काढायला जाते..
ऑफिसर : जर तुम्ही गाड़ी चालवत असाल आणि तुमच्या समोर एक कोंबडी आणि एक म्हातारा माणूस आला तर तुम्ही काय माराल?
मुलगी : कोंबडी
ऑफिसर : तुम्ही फेल झालात घरी जा.
ती घरी जाते आणि परत दुसऱ्या दिवशी लायसेंस काढायला येते, परत ऑफिसर तोच प्रश्न विचारतो, मुलगीपण परत तेच उत्तर देते आणि परत नापास होते. असे ७ ते ८ वेळा होते. पुन्हा एकदा ती लायसेंस काढायला जाते आणि पुन्हा तोच प्रश्न
यावेळी मुलगी उत्तर देते “म्हातारा”
ऑफिसर : तुम्ही फेल झालात घरी जा.
मुलगी चिडून म्हणते “काय हो मी काहीही उत्तर दिले तरी तुम्ही मला नापसच करता. तुम्ही सांगा ना मग त्या प्रश्नाचे उतर”
ऑफिसर : आहो, ब्रेक मारिन मी ब्रेक


बार समाेरच एक तलाव हाेता. भर पावसात एक म्हातारा तिथे मासेमारीसाठी गळ टाकून बसला हाेता. एका तरूणाला दया आली
तरूण म्हणाला “बाबा किती थंडी आहे चला मी तूम्हाला व्हिस्की पाजताे.”
व्हिस्की पीता पीता तरुणाने विचारले, “बाबा गळाला किती मासे लागले?”
म्हातारा म्हणाला “तू आठवा आहेस बेटा”


बाबा : काल रात्री कुठे होतास?
मनोज : मित्राच्या रुम वर Group Study करत होतो
बाबा : रात्रीची ऊतरली नाही तुझी बेटा, तुला नोकरी लागुन दोन वर्ष झालीत


जोशी : माझी बायको फार रागीट आहे, छोटया छोट्या गोष्टीवर चिडत असते
कुलकर्णी : माझी बायको पण फार रागीट होती पण आता शांत झालीय
जोशी : कसे काय, काय केलं तू?
कुलकर्णी : काही नाही. मी एकदा म्हटलं, म्हातारपण आलं की बायका अशी चिडचिड करतातच. तेव्हापासून ती रागवायचं विसरूनच गेली


डॉक्टर : बाळा आ कर आ
आई : त्याला फक्त English कळतं
डॉक्टर : बरं बाळा “ओपन योर माऊथ”
आई : थांबा मी सांगते, “बाळा, डू आ, डू आ…”
Semi English आहे ना तो


एका विद्यार्थ्याच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा सण – परीक्षा
दिवे पण लागतात, फटाके पण फुटतात, बँड पण वाजतो आणि घरचे आरती पण ओवाळतात


बॉयफ्रेंड : तू माझा फोन का उचलला नाहीस?
गर्लफ्रेंड : आरे बाबा! आता झोपून उठले, मम्मीने Coffee आणून दिली आहे आणि तीच पित आहे.
बॉयफ्रेंड : पण तुझी आई बोलली कि तू शेण टाकायला गेली म्हणून?


तीन मित्र एका Hotel मध्ये ७५ व्या मजल्यावरच्या खोलीत राहत असतात. लिफ्ट बंद असल्याने जिन्याने चढणे कंटाळवाणे होऊ नये म्हणून ते ठरवतात की पहिले २५ मजले चढेपर्यंत एकाने जोक्स सांगायचे. त्यापुढचे २५ मजले दुसऱ्याने गाणी म्हणायची आणि त्यापुढचे २५ मजले चढेपर्यंत तिसऱ्याने वाईट बातम्या सांगायच्या.
पाहिल्याचे जोक ऐकत २५ माजले जातात. दुसऱ्याची गाणी ऐकत ते पुढचे २५ माजले चढतात. ५१ व मजल्यावर आल्यावर तिसरा म्हणतो ‘पहिली वाईट बातमी ही आहे की मी खोलीच्या चाव्या गाडीत विसरलोय!”
दोघे त्याला कुत्र्यागत तुडवतात… चुकीला माफी नाही…


नातू : आज्जी मी Running रेस मध्ये भाग घेतलाय. आशीर्वाद दे मला
आज्जी : सावकाश पळ रे बाबा


एक पोलीस क्राईम ब्रँच मध्ये फोन करतो
क्राईम ब्रँच : हा बोला
पोलीस : साहेब, मी ढापणे शिपाई बोलतोय, एक खून झालाय… इथे एका बाईने तिच्या नवऱ्याला पुसलेल्या फरशीवर पाय ठेवला म्हणून गोळी घातली
क्राईम ब्रँच : मग तुम्ही तिला अटक केली का नाही?
पोलीस : नाही साहेब… फारशी आजून वळली नाही


Comedy Jokes in Marathi


मुलगी पाहण्याचा कार्यक्रम चालू असतो. मुलाकडील साधी माणसे असतात.
मुलगा : शिक्षण?
मुलगी : M.A.B.F.I.A.S
मुलगा भांबावला पण विचारावे कसे? ती आपल्याला अशिक्षित समजेल. ते निघून जातात. दोन दिवस मुलगा बैचैन. ना राहून शेवटी मध्यस्थाला अर्थ विचारतो.
मध्यस्थ : मॅट्रिक ऍपियर बट फेल इन ऑल सब्जेक्टस
मुलगा कोमात


कोर्टात घटस्फोटाचा खटला अंतिम टप्प्यात आलेला असतो. शेवटची संधी म्हणून न्यायाधिश प्रश्न विचारतात..
न्यायाधीश : बाई तुम्हाला या माणसाकडे नांदायला जाण्याची इच्छा आहे का ?
बाई : साहेब एक वेळ मी तुमच्याकडे नांदायला येईल पण या माणसाकडे जाणार नाही
(न्यायाधीश कावरा बावरा झाले)


एक मुलगी फोटो काढायला जाते आणि म्हणते पासपोर्ट फोटो काढायचा आहे आणि हो माझी नवी चप्पल सुद्धा यायला पाहिजे.
फोटोग्राफर म्हणाला चालेल, चप्पल घाला आणि संडासला बसतात तसं बसा


सोन्या आणि मोन्या दोन भाऊ एकाच वर्गात शिकत होते. शाळेतील मुख्याध्यापकांनी त्यांना ऑफिस मध्ये बोलावले.
मुख्याध्यापक : काय रे सोनू मोनू तुम्ही तर दोघे सख्खे भाऊ आहात, मग पेपर मध्ये वडिलांचे नाव वेगवेगळे का लिहिले?
सोन्या : बस काय सर …. परत तुम्हीच म्हणाला असता …. कॉपी केली म्हणून
मुख्याध्यापक जागेवर कोसळले


मुलगी : मला i-Phone घ्यायचा आहे
मुलगा : वाह वाह …. भारीच की ….
मुलगी : कोणत्या कंपनी चा घेऊ ?
मुलगा : पतंजली चा घे …. गंजत नाही


Marathi Funny Jokes


ऐन दुपारची वेळ होती. एका बस स्टॉपवर २०-२५ प्रवासी बराच वेळ बसची वाट बघत उभे होते.
कडक ऊन असल्याने सगळे जण त्रासले होते. तेवढ्यात तिथे एक भिकारी आला. त्याने सगळ्यां कडून एक-दोन रुपये गोळा केले.
रिक्षाला हात दाखवला आणि त्यात बसून तो ऐ‌टीत निघून गेला.


बंड्या मोटारसायकल वरून भरधाव जात असतो.
पोलिस : नो एंट्रीचा बोर्ड दिसला नाही का तुला?
बंड्या : दिसला साहेब. पण मला वाटले सिनेमाचे पोस्टर आहे!


बाबा, सगळ्या मुलांना घ्यायला त्यांच्या आई येतात मग मला घ्यायला तुम्हीच का येता?
म्हणूनच येतो रे राजा…


Marathi Vinodi Joke


बंड्याचे वडील सांगत असतात “कितीही झाले तरी मुलापेक्षा बापच जास्त हुशार असतो.”
बंड्या : अच्छा, मग मला सांगा बरं फोनचा शोध कुणी लावला?
बंड्याचे वडील : ग्रॅहम बेल ने
बंड्या : मग त्याच्या बापाने का नाही लावला?


स्टॅन्ड वर नंदू गाणं म्हणत असतो. तेवढ्यात एक मुलगी समोरून जाते
नंदू : ए क्या बोलती तू ?
मुलगी : क्या मै बोल ?
नंदू : सून
मुलगी : सुना
नंदू : हाय का तंबाखू चुना


पक्या बस मध्ये उभा होता. अचानक “ब्रेक” लागल्यामुळे समोरच्या मुलीवर जाऊन पडला.
मुलगी : नालायका, काय करतोस???
पक्या : डिप्लोमा, तू काय करतेस??


आज तलाठी कार्यालयात गेलो होतो. एक बोर्ड लावलेला होता –
“आंगठा लावल्यानंतर भिंतीला पुसू नये”
जर एवढ वाचता आलं असत तर अंगठा कशाला लावला असता हो?


Funny Marathi Jokes in Marathi Language


हायस्कुलच्या दोन मुली
पहिली : बाबा म्हणाले या वर्षी नापास झालीस, तर तुझं लग्नच लावावं लागेल
दुसरी : मग किती तयारी केलीस तु?
पहिली : सगळ केलय फक्त Facial बाकी आहे


बघा मराठी भाषा आपला मौल्यवान वेळ कसा वाचवते.
इंग्रजी मध्ये – I m sorry, I can’t hear you properly. Can you please repeat what you just said?
मराठीत : आँ


मुलगा : आज पण वांग्याची भाजी, मी नाही जेवणार, मी हॉटेलमधे जातो.
बाबा : माझे पायतान कुठे आहेत गं?.
मुलगा : मी मस्करी करत होतो बाबा, वांग्याची भाजी आरोग्यास चांगली असते
बाबा : जास्त ज्ञान पाजळू नको, पायतान आण गुपचूप, मी पण तुझ्याबरोबर हॉटेल मध्ये येतोय


दोन वेडे एकमेकांना फोन करतात
पहिला वेडा : हेलो मी बोलतोय
दूसरा वेडा : काय योगायोग आहे, इकडे पण मीच बोलतोय


डॉक्टर : सांग तुला न्युमोनीयाचा त्रास पुर्वी कधी झाला होता का ?
पेशंट : हो, एकदाच.
डॉक्टर: कधी?
पेशंट : त्याचे स्पेलींग सरांनी विचारले तेव्हा.


एक म्हातारी बाई रोज बस ने देवळात जायची. ती ज्या बस ने जायची त्या बस कंडक्टरला रोज बदाम काजू खायला द्यायची.
एक दिवशी कंडक्टरने म्हाताऱ्या बाई ला विचारले, “कि आजी मला रोज काजू बदाम खायला का देते..?”
म्हातारी बाई म्हटली, “बेटा आता मी म्हातारी झाली आहे, आणि त्यामुळे दात पण पडलेत, काजू बदाम नुसते चघळून फेकून देन चांगल नाही ना”


मैने पूछा चांदसे के देखा है कही मेरे यार सा हसीं??
चांद ने कहा – हे बघ एक तर इतक्या लांबून काहीही दिसत नाही. दुसरं म्हणजे दिसत असलं तरी तुला सांगायला की काही तुझ्या बापाचा नोकर नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची नाटकं तुमच्याजवळच ठेवा मला त्यात काडीचाही इंटरेस्ट नाही


मुलगी : आई, आज मला एका मुलाने गालावर किस केलं
आई : मग त्याला कानाखाली मारलीस की नाही?
मुलगी : नाही आई, मला तेव्हा गांधीगिरी आठवली आणि मी दुसरा गाल पुढे केला


एक बाई एकटी स्मशानात एका कबरीवर बसली होती.
तिथून जाणाऱ्या हवालदाराने विचारले…
बाई … इथे एकट्या काय करताय? भीती नाही वाटत काय ?
बाई : भीती कसली? आतमध्ये फार उकडत होतं म्हणून बाहेर येउन बसले


एक ज्योतिषी (झंप्याची कुंडली बघत) : अरे वा पोरा, तुझी कुंडली सांगतेय की तू खूप शिकणार आहेस.
झंप्या जोर जोरात हसतो
ज्योतिषी : का रे, हसतोयस का असा ?
झंप्या : बाबा मी खूप शिकणार ते मलाही माहितीय. पण मी पास कधी होणार ते सांगा.


Funny Jokes in Marathi


झंप्या कोल्डड्रिंकच्या दुकानात गेला.
झंप्या – ओ…एक पेप्सीची बॉटल उघडा. दुकानदार उघडतो.
झंप्या – एक लिम्काची बॉटल उघडा. दुकानदार उघडतो.
झंप्या – एक कोकाकोलाची बॉटल उघडा. दुकानदार उघडतो.
झंप्या – एक मिरिंडाची बॉटल उघडा.
दुकानदार – ( वैतागून) ए…किती बाटल्या उघडायला लावतोयस ? तुला नक्की काय प्यायचंय ते सांग ना ?
झंप्या – आहो प्यायचं तर काहीच नाही. मला ना , तो बॉटल उघडण्याचा आवाज खूप आवडतो (फस्स…फस्स)


रेखाच तिच्या नवर्यावर खुप प्रेम होत. आणी एक दिवस तिचा नवरा मरतो.
लोक बोलत होती : रेखा नवर्याशीवाय रेखा जगू शकत नाही. आणि होतं ही तसचं
रेखा दुसऱ्याच आठवड्यात दुसरं लग्न करते.


बंडया दारू पिऊन बार मधून बाहेर पडतो. गाडीत बसतो आणि घरी फोन करून सांगतो, “मला घरी यायला वेळ लागेल, गाडीचे स्टेअरिंग गिअर क्लच सगळे चोरीला गेले आहे”
दहा मिनिटांनी परत फोन करतो आणि सांगतो, “सगळे सापडले, मी चुकून मागच्या सीटवर बसलो होतो”

Liked it? Share with your friends...

One thought on “Funny Jokes in Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *