Marathi Charolya Sad

किती प्यावे हे जहरिले अनुभव कोळून साखरेत घोळून?
हृदय होते छिन्न विछिन्न स्वप्न जाते क्षणात जळून


जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खुप हसवते
तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खुप रडवते


अंतरातले मुके दु:ख हे गहीवरूनी कां रडले
डोळ्यातून हा विरह सांडतो प्रेम असे कां जडले

जखम आयुष्यातील शब्दात उतरवले, अश्रू पिऊन आयुष्य माझे जगवले
सुख तर कधी न मिळाले आयुष्यात, दुःखालाच मी प्राणप्रिय यार बनवले


तुझं काय गं तू येउन पुन्हा जाशील
सुखावलेल्या जखमांवरच्या खपल्या पुन्हा काढून जाशील


तू दिलेल्या जखमा देखील हल्ली हव्या हव्याश्या वाटतात
कदाचित त्या जखमांमुळेच तुझ्या आठवणी ताज्या राहतात


Marathi Virah Charolya


माझ्या आयुष्याच्या गणितात दु:खांचा हिशोब अगदी रास्त होता
होरपळलेल्या प्रत्येक दु:खी क्षणात तुझाच वाटा जास्त होता


मी कधी तुझ्यापासून खूप दूर गेलो तर माझी आठवण काढशील ना
मी कधी तुझ्यापासून खूप दूर गेलो तर एकांतात माझ्यासाठी रडशील ना


आज तुझा एकही शब्द कानी पडत नाही
जो आवाज तेव्हा सतत सोबत असायचा
आता तोच आवाज जराही जाणवत नाही


तुझ्या आठवणींच्या दुनियेत हरवून जाण, जणू काही नियतीनेच ठरवलेलं
वागणं असेल नित्याचच, परंतु जगणं मात्र तुझ्यात हरवलेलं


रुसले होते भाव कधीचे शब्द जोडीला नसताना
पण कसे सुचावे शब्दांना तव स्मृतीत गुंतले असताना


देवा तुझ्यासारखं मलाही तू दगडच बनवलं असतस तर किती बरं झालं असतं
पुजल नसतं तरी चाललं असतं, निदान असं असं मला कुणी लाथाडून तरी गेलं नसतं


वेदनामय आठवणीच का मन मनात साठवते
विसरायचं म्हणतानाच ती पुन्हा एकदा आठवते


Marathi Charolya Sad


माणसं विसरतात मला पण मी त्यांना कसं विसरावं
मनात बांधलेलं घर नात्याचं आपणच कसं तोडावं


पुरता पुरेना ते आयुष्य, मिळता मिळेना ते प्रेम
जुळता जुळेना ती सोबत, पुसता पुसेना ती आठवण


 आभासी जगातील खोटेच सारे भास
लावू नये कुणाकडून कधीही खोटी आस


 काही माणसं हरवतात डोळ्यासमोर दिसत असली तरी
आणि काही मात्र दिसत राहतात डोळ्यासमोर नसली तरी


Marathi Sad Charolya


 आश्रू शिंपून हास्याची शेती पिकवतो मी
दुःख निराशेच्या गावात आनंद विकतो मी


Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *