Marathi Charolya Comedy

माझी दोरी त्याच्या गळ्याला, त्याची तिसऱ्याच्या गळ्याला
खूप उशिरा कळलं चैन मार्केटिंग म्हणतात त्याला


मोबाईलने भल्या भल्यांना शिकविले खोटे बोलायला
मिटिंग मध्ये व्यस्त आहे, बारमधून बायकोला मेसेज पाठवला


जरी शिक्षण घेण्यासाठी लावलेलं कॉलेज आहे
तरी कॉलेज पेक्षा जास्त कट्ट्यावरच Knowledge आहे


सकाळी हसतेस दुपारी हसतेस संध्याकाळी हसतेस रात्री हसतेस
घरात हसतेस रस्त्यात हसतेस, येताना जाताना बघून हसतेस
तुला काय वाटतं तू एकटीच दात घासतेस ???


प्रिये मी फुले मागितली तू मला पुष्पगुच्छ दिलास
मी दगड मागितले तू मला सुंदर मूर्ती दिलीस
मी मोरपीस मागितले तू मोर दिलास
तू बहिरी आहेस कि काय ??


जेव्हा तुला अगदी एकट वाटेल, नजरेसमोर धुके वाटेल, आसपास कोणीच दिसणार नाही
सगळे जग अंधुक होऊन जाईल, तेव्हा तू  माझ्याकडे ये मी तुला डोळ्यांच्या डॉक्टरांकडे घेऊन जाईन


Marathi Vinodi Charolya


कवी झाले स्वस्त मूर्खपणा चाललाय मस्त
लिहा की बिनधास्त नको अपेक्षा जास्त


Liked it? Share with your friends...

One thought on “Marathi Charolya Comedy

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *