Marathi Charoli On Rain

माझी कहाणी ऐकून तोही रडला
लोक वेडी म्हणतात पाऊस कसा पडला?


आभाळ बरसताना बोलू नये आभाळ फक्त पाहत राहवं
भिजता आलं नाही तरी मनोमन नाहत राहवं


जगभरून फिरून पाऊस नेमका तुझ्या घरापाशी बरसतो
मूर्ख चातक पक्षी इथे एका थेंबासाठी तारसतो


ओल्या तुझ्या त्या स्पर्शाला मंद मंद असा सुवास आहे
आजही आठवतोय तो पाऊस, अडकलेला ज्यामध्ये माझा श्वास आहे


आत्ता पाऊस येईल आणि भिजून जाईल गाव
आणि कुठल्यातरी थेंबावर माझंही असेल नाव
(कवी : चंद्रशेखर गोखले)


पावसाची गोष्ट पाऊस रात्रभर सांगत राहिला
आणि घरामागचा डोह दुथडी भरून वाहिला
(कवी : चंद्रशेखर गोखले)


मी ओंजळीत पाऊस भरतो आणि तुझ्याकडे पाठवतो
पाऊस म्हटलं कि मला हा एकच उद्योग आठवतो
(कवी : चंद्रशेखर गोखले)


पाऊस पडायच्या आधी मला पाऊसाच स्वप्न पडतं
आणि मग पुढे एक दोन दिवस माझं कामावरच लक्ष उडतं
(कवी : चंद्रशेखर गोखले)


आठवणारा पाऊस हा कोसळणाऱ्या पाऊसापेक्षा वेगळा असतो
त्या पाऊसात कसा मी चिंब चिंब भिजताना दिसतो
(कवी : चंद्रशेखर गोखले)


पावसाचा आस आहे माझ्या तहानलेल्या मनाला
कोणाची वाट बघतोस विचारल्यावर काय सांगत बसू कोणाला ?
(कवी : चंद्रशेखर गोखले)


Marathi Rain Charolya


एक हरवलेला पाऊस मी शोधत राहतो अजूनही
म्हणून मी कोरडा राहतो प्रत्येक पावसात भिजुनही


पावसाच्या सरीनंतर भिजून गेलं रान
आणि माझ्या हाती राहिलं लाजाळूचं पान

Liked it? Share with your friends...

One thought on “Marathi Charoli On Rain

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *