Mala Mobile Vhaychay

मला मोबाईल व्हायचंय!

 

“मला पुनर्जन्म मिळाला तर मी मोबाईल होईन, कारण आई, बाबा, दीदी सगळेच सकाळी उठले की आधी त्यांचा मोबाईल शोधता..

कधीकधी तर मी बोललेलं पण कुणी ऐकत नाही आणि मी काहीही नवीन छान केलं ना की सगळे फोनमधे फोटो काढून घेतात… मला तोंडावर कुणी शाबासकी नाही देत पण ते व्हाट्सअँप, फेसबुक वर त्यांच्या मित्रमैत्रिणींना कौतुकाने सांगतात.

माझ्यासोबत खेळायला कुणालाच वेळ नसतो पण मोबाईलमधे गेम खेळतात आणि मी पण खूप त्रास द्यायला लागलो की मलाही बालगीते लावून देतात फोनवरच. आजीआजोबा व्हिडिओ कॉल मधूनच बघता येतात, त्यांना वेळ नाही ना मला भेटायला यायला म्हणून मला मोबाईलच व्हायचंय..

म्हणजे मी सगळ्यांचा लाडका होईल”.सहा वर्षांचा अनुज शाळेतल्या ‘पिक अँड स्पीक’स्पर्धेत बोलत होता.

 

#१००शब्दांचिगोष्ट

©®सुवर्णा राहुल बागुल

Liked it? Share with your friends...

You May Also Like

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *