Latest New Marathi Jokes

निराशावादी:- ही ट्रेन अर्धी भरलेली आहे.
आशावादी: ही ट्रेन अर्धी रिकामी आहे
मुंबईकर:- अंदर चलो भाई, पुरा ट्रेन खाली है.


डोळ्यातून पाणी आले त्या बिचाऱ्या इंजिनिअरच्या
जेव्हां त्याची आई म्हणली : पोरा, रिकामाच बसला आहेस तर रांगोळी चे ठिपके तरी काढून दे


आनंदाची बातमी
लवकरचं पेट्रोल ५० रुपयात मिळणार
आर्धा लिटर


नवरात्री स्पेशिअल
तो : हाय, तुझं नाव काय आहे?
ती : पुढच्या राऊंडला सांगते


रु.२००/- ची नोट केवळ लग्न, मुंज बारसं, इत्यादी कार्यक्रमाला आहेर म्हणून देण्यासाठी केलेली आहे
कारण रु.१००/- देणे चांगले वाटत नाही, आणि रु.५००/- देणे जिवावर येते


एकदा एका आजींनी हॉस्पिटल मध्ये फोन केला आणि म्हणाल्या- “मला रूम नंबर 302 मधल्या निर्मला नेने यांची तब्येत कशी आहे ते कळू शकेल का? जरा काळजी वाटतीये म्हणून फोन केला.
‘जरा दोन मिनिटं होल्ड करा हं’ असं म्हणत तिथल्या ऑपरेटर नी तिसऱ्या मजल्यावरच्या नर्स शी फोन जोडून दिला. नर्स म्हणाली- बऱ्या आहेत त्या आता. बीपी पण नॉर्मल झालंय आणि सगळ्या टेस्ट्स पण नॉर्मल आल्यात. डॉक्टर म्हणतायत उद्या सोडतील घरी त्यांना.
“वा वा! खूप बरं वाटलं ऐकून धन्यवाद” आजी म्हणाल्या
नर्स- तुम्ही त्यांची बहीण बोलताय का?
नाही, मी स्वतः निर्मला नेने बोलतीये 302 मधून, मला कोणीच काही धड सांगेना, म्हणून म्हणलं स्वतःच चौकशी करावी


संतूर साबणाच्या जाहिरातीत लहान मुलांच्या आईच का दाखवतात? बाबा का दाखवत नाहीत?
मुलांचे बाबा काय निरम्याने आंघोळ करतात काय?


मला एक कळत नाही की
श्रीमंत मित्रांच्या बरोबर मैत्री केली तर आपण श्रीमंत होत नाही तसेच
हुशार मित्रांच्या बरोबर मैत्री केली की आपण हुशार होत नाही पण
दारूड्या मित्रा बरोबर मैत्री केली की आपण पण दारूडे कसे होतो


मी काय म्हणतोय, त्या बुलेट ट्रेन मध्ये विनातीकीट सापडलं तर भारतातल्या जेल मध्ये ठेवणार का जपानच्या??


डॉक्टर : आपण कोणता साबण वापरता ?
गण्या : पाडुरंगाचा लींबाचा साबण
डॉक्टर : कोणती पेस्ट वापरता ?
गण्या : पाडुरंगाची आयुर्वेदिक पेस्ट
डॉक्टर : शॅम्पू ?
गण्या : पाडुरंगाचा हर्बल शैम्पू
डॉक्टर : हेयर ऑईल ?
गण्या : पाडुरंगाच आवळ्याच तेल
डॉक्टर : हे पाडुरंग मल्टीनॅशनल कंपनी ब्रॅण्ड आहे की पॉप्युलर लोकल ब्रॅण्ड आहे ?
गण्या : नाही….पाडुरंग माझा रूम पार्टनर आहे


५ स्टार हॉटेल मध्ये पहिल्यांदा गेलेल्या एका माणसान चहाची ऑर्डर दिली. वेटरन गरम पाणी, टी बॅग, साखर, दुध आणून त्याच्या समोर ठेवले …
कसाबसा चहा पिऊन झाला. वेटरन विचारल, “अजुन काही घेणार का?”
माणूस म्हणाला, “भजे खाचे होते , पण राहू दे, तू कढई, तेल, बेसन, कांदे आणून ठेवशीन


आई : बाळ तू खूप मोठा हो
बाळ : आई मी इतका मोठा होईल की पोस्टाच्या तिकीटावर माझा फोटो राहील.
आई : बाळ इतका मोठा नको होऊ कारण लोक मागून थुका लावतात आणि पुढून बुक्क्या मारतात.


एक पत्नी : डॉक्टर, माझ्या नवर्‍याने चुकून पॅन कार्ड गिळलंय, काहीतरी करा पट्कन
डॉक्टर : शांत व्हा, त्यांना आधार कार्ड पण गिळायला सांगा. दोन्ही लिंक झाल्याशिवाय मी काहीच करु शकत नाही.


आता 10 वर्षाच्या पोरांजवळ iPhoneआणि Smartphones आहे
आणि आम्ही 10 वर्षाचे होतो तेव्हा आमच्या जवळ एक फ़ोन होता
कोणतेही बटन दाबल्यावर एकच आवाज यायचा …. “चल छैयां छैया छैया… छैयां”


कोंबडी गेली किराणा दुकानात… म्हणाली, एक अंडे द्या
दुकानदार म्हणाला : तू स्वतः कोंबडी असून अंडे विकत घेतेस?
कोंबडी म्हणाली : माझा नवरा म्हणाला विकतच आण, चार-पाच रूपयांसाठी फिगर नको खराब करू


मारी बिस्किटे बनविणारी कंपनीला एक नम्र विनंती…
एक तर बिस्किटांचा आकार कमी करा किंवा कप बनविणाऱ्या लोकांशी एकदा बोलून तरी घ्या


एका माणसाने चुकून सीम कार्ड खाल्ले. त्याच्या बायकोने घाई घाईने दवाखान्यात नेले.
डॉक्टर : काय झाले?
बायको : आहो यांनी चुकून सीम कार्ड खाल्ले
डॉक्टर : बापरे यांना ताबडतोब हॉस्पिटल मध्ये न्या
बायको : आहे ते जाऊ द्या पण हे जर बोलले तर माझा बॅलेन्स नाही ना संपणार?


गण्या नवीनच कामाला लागला होता, सगळा कामाचा प्रकार समजून घेतल्यावर गण्याने चहा मागविण्यासाठी फोन लावला तो बॉस च्या केबिन चा नंबर होता
बॉस : येस कोण बोलतंय ?
गण्या : ये स्टाफ रूम मध्ये एक चहा पाठव
बॉस (भडकून) : तुला माहिती आहे का ? तू कोणाशी बोलत आहेस ते? मी ह्या कंपनीचा मालक आहे,
गण्या गडबडला पण त्याही स्थितीत तो स्वतःला सावरून बोलला पण तुम्हाला माहिती आहे का मी कोण बोलतोय तो ?
बॉस : नाही
गण्या : वाचलो (गण्याने फोन आदळला)


शाळेत इन्स्पेक्टर येतो आणि एका मुलाला प्रश्न विचारतो : शिवधनुष्य कुणी मोडलं?
विद्यार्थी : “मी नाही मोडलं” म्हणून भोकाड पसरतो…
इन्स्पेक्टर चकित होतात आणि गुरुजींना विचारतात : असं काय म्हणतो हा मुलगा?
गुरुजी म्हणतात : मुलगा गरीब बिचारा आहे, तो अशी काही तोडफोड करेल असं वाटत नाही.
इन्स्पेक्टर जातो हेड मास्तरांकडे. त्यांना सांगतो. मी “शिवधनुष्य कुणी मोडलं?” असं विचारलं तर तुमच्या शाळेतला मुलगा म्हणतो की “मी नाही मोडलं” गुरुजी म्हणतात की “मुलगा तसं काही करण्यातला वाटत नाही.” हा काय प्रकार आहे …???
हेडमास्तरांना राग येतो. ते म्हणतात : कोण नाही म्हणतो? आत्ता छडी घेऊन आलो ना की सगळे कबूल करतील “मीच मोडलं” म्हणून….!
हे सर्व प्रकरण जातं शिक्षण मंत्र्यापर्यंत. शिक्षणमंत्री म्हणतात : आता मोडलं ना शिवधनुष्य? चुप बसा. आधीच इतक्या गोष्टी अंगाशी आल्या आहेत त्यात ही एक नको. पुढल्या बजेटला पैसे सँक्शन करतो, नवीन घ्या दोनतीन, आत्ता चर्चा नको.
इन्स्पेक्टर हताश होऊन आपल्या घरी येतो आणि बायकोला म्हणतो : एक प्रश्न विचारला “शिवधनुष्य कुणी मोडलं?” तर कुणालाही माहिती नाही. तुला तरी आहे का माहिती?
ती म्हणते : सकाळपासून काम करून करून मी दमले आहे. त्यात तुम्ही आता येऊन काहीतरी फालतू प्रश्न विचारत आहात. मला काय माहिती हे काय कुणी मोडलं ते? तुमचं नेहमीचंच आहे, स्वत: मोडायचं आणि दुसऱ्यावर ढकलायचं!


इन्कमटॅक्स ऑफिसर : तुमच्या बँक खात्यात तुम्ही ५०,००० भरले आहेत. कुठुन आले सांगू शकाल ?
माणूस : सगळा गाव बैंकेत पैसे भरत होता, मी कशाला माझी इज्जत घालवू? म्हणून व्याजाने आणून भरले आहेत


हे वर्ष भारीच आहे
देवाने सगळेच ऐकले
ये रे ये रे पावसा – तो आला
तुला देतो पैसे – तो दिला
पाऊस आला मोठा – तो आला
पैसा झाला खोटा – आता तोही झाला


काल बसमध्ये माझ्यासमोर २ मुली बसल्या होत्या, एक भारतीय आणि दुसरी चायनीज
मी फक्त भरती मुलीकडेच पाहत होतो
बहिष्कार म्हणजे बहिष्कार


एक भिकारी देवाला – हे देवा मला खाण्यासाठी असे काही दे जे खाल्यावर सुद्धा संपले नाही पाहिजे
देव – हे घे पोरा चिंगम


मनोज : एक सांग मला, जगात सगळ्यात सुखी कोण आहे?
रवी : भेळ, लालची सुखी भेळ


६० मिनिटाच्या Walk नंतर ६१ व्या मिनिटाला तुम्हाला काहीतरी दिसतं
६३ व्या मिनिटाला समजते की ती वाडा पावची गाडी आहे
६४ व्या मिनिटाला तुम्ही एक वडापाव Extra गोड चटणी बरोबर ऑर्डर करता
६६ व्या मिनिटाला तुम्हाला Guilty Feel होते कारण वडापाव Junk Food आहे म्हणून
६७ व्या मिनिटाला तुम्ही विचार करतात आज एक दिवस खाल्ला तर काय होतंय? उद्या जास्त चालेन
७२ व्या मिनिटाला तुम्ही आजून एक आणि ७७ व्या मिनिटाला तिसरा वडापाव ऑर्डर करतात आणि संपवतात
८० व्या मिनिटाला एक Thumbs Up आणि मग ८४ व्या मिनिटाला रिक्षा करून घरी जाता.
एक महिन्यानंतर ….. ५ किलो वजन वाढलेले असते आणि तुम्ही सर्वांना सांगत सुटता, कितीही केले तरी हे वजन काही कमीच होत नाही


एक लहान घाबरलेला मुलगा धावत घरी येतो आणि आईला म्हणतो, ” आई, आई लवकर मला एक Apple दे. लवकर दे.”
आई विचारते, “अरे इतकी काय घाई आहे. आधी हात पाय धू.”
मुलगा म्हणतो, ” नको, आधी तू Apple दे. मी आपल्या शेजारच्या डॉक्टर काकांच्या खिडकीची क्रिकेट खेळताना आत्ताच काच फोडली.”


एका ऑफिस मध्ये अकाउंटंट पदासाठी भरती सुरु होती. मुलखात घेणाऱ्याने विचारलं, “दोन अधिक दोन किती?”
उमेदवाराने इकडे तिकडे पहिले आणि विचारलं, “किती दाखवायचे आहेत?”
झाली ना निवड त्याची डायरेक्ट अकाउंटंट हेड


भारतात १००० मुलांच्या प्रमाणात ९४३ मुली आहेत. म्हणजे ५७ मुलं लग्नाशिवाय रहातात.
हीच ५७ मुलं पुढे जाऊन वाजपेयी, कलाम वगैरे बनतात.
उरलेल्या ९४३ मुलांना सँडविच बरोबर दुसऱ्यांदा सॉस हवा असेल तरी बायकोची परवानगी घ्यावी लागते


जज : घरामध्ये सगळे होते मग तू चोरी कशी केली?
चोर : जजसाहेब तुमची चांगली नोकरी आहे, पगार पण चांगला आहे. तुम्ही हे सगळ शिकून काय करणार?


गण्या : अरे राजा सरकार गुटख्याची किंमत वाढवणार आहे. आता काय करायचे?
राजा : आरे करायचे काय? आर्धा तास लेट थुंकायचे


सामाजिक भेदभावाचे एक उदारहण
मिसेस ओबेरॉय चे हजबंड ड्रिंक घेतात
सारलाचे पती दारू पितात
गंगुबाईचा नवरा बेवडा आहे


आज कालची पाचवीची पोरं केसांना जेल लावून फुल मॉडेलिंग करत शाळेत जातात आणि आमचा जमाना होता जेव्हा आमची आई खोबऱ्याचे तेल लावून असा भांग पाडून द्यायची की चक्रीवादळ जरी आलं तरी इकडचा केस तिकडं जायचा नाही.


एक संन्यासी भेटला, मी विचारले, “बाबा कसे आहात?”
संन्यासी : बेटा आम्ही तर संन्यासी आहोत. आमचा राम ठेवेल तसे आम्ही राहतो. तुम्ही कसे आहात?
मी म्हणालो, “आम्ही संसारी, आमची सीता ठेवेल तसे आम्ही राहतो.


साडीच्या दुकानात बायकांचा फक्त हाच प्रश्न असतो –
या डिजाईन मध्ये दुसरा कलर दाखवा आणि या कलर मध्ये दुसरी डिजाईन दाखवा


कॉलेजच्या फळ्यावर एक सुविचार लिहिला होता
“झाडावर आपल्या गर्लफ्रेंडचे नाव लिहिण्यापेक्षा तिच्या नावाने एक झाड लावा”
मग त्याने मैत्रिणींची यादी केली आणि शेवटी ३ एकरात ऊस लावला


लग्नपत्रिकेतील एक जोक – आपली उपस्थिती हाच आहेर
कृपया आहेर आणू नये


प्राजक्ता : दादा काहीतरी चांगला भाव लावा, आम्ही नेहमी याच दुकानातून साड्या घेतो
दुकानदार : देवाला तरी घाबरा ताई, आता दोन दिवसांपूर्वी दुकान उघडलं आहे


गाण्याला एका मुलीचा मेसेज आला
मुलगी बोलली – Hi
गण्या – Yes
मुलगी – How are you?
गण्या – Fine
मुलगी – where u r from?
गण्या – Mumbai
मुलगी – तुझं शिक्षण किती झालं आहे?
गण्या – तुझ्या एवढं
मुलगी – माझ्या एवढ म्हणजे?
गण्या – मी पन एवढंच इंग्लिश बोलून डायरेक्ट मराठीत सुरु होतो


अमेरिकन : आमच्या देशात सगळे लोक उजवीकडून गाड्या चालवतात. तुमच्याकडे काय पद्धत आहे?
भारतीय : तसं काय फिक्स नसतं, म्हणजे समोरचा कुठून येतोय त्या प्रमाणे…..


टीचर : कोणत्याही एका वैज्ञानिकाचे नाव सांगा
गण्या : आलिया भट्ट
टीचर : माकडा, वर्गाच्या बाहेर हो!
मक्या : ओ टीचर, बोबडा आहे तो. त्याला आर्यभट म्हणायचंय


आजोबा : बंड्या लवकर लपून बस. ८ दिवस शाळेत गेला नाहीस म्हणून तुझे सर आले आहेत तुला शोधायला.
बंड्या : आजोबा, तुम्हीच लपून बसा. मी शाळेत सांगितलंय आजोबा वारले आहेत म्हणून


Marathi New Jokes


आमच्या शाळेतले मराठीचे शिक्षक एकदा माझ्या ऑफिसवर आले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या मग गाडी संसारावर आली.
सरांनी मला विचारले, “मुलं बाळ किती?”
मी म्हणालो, “हो दोन आहेत, पहिलीला एक अन दुसरीला एक!”
मास्तर जागेवर बेशुद्ध. खरंच अवघड आहे मराठी भाषा समजणं. कशीही वळते!!


सायकॉलॉजि चा तास चालू होता. सरांनी उंदराच्या एक बाजूला केक आणि दुसऱ्या बाजूला उंदरीण ठेवली.
उंदीर लगेच केककडे धावला. सरांनी केकच्या ऐवजी भाकरीचा तुकडा ठेवला, पुन्हा तोच प्रकार.
सरांनी पदार्थ बदलून पाहिले, उंदीर प्रत्येक वेळी पदार्थाकडेच धावला.
सर म्हणाले – यावरून हे सिद्ध होते की या जगात भुकेपेक्षा मोठं काही नाही.
एवढ्यात पक्या म्हणाला – सर, एवढे पदार्थ बदललेत, एकवेळ ती उंदरीण बदलून बघा ना !!!


कितीही शिकलो तरी दरवाज्यावर PUSH आणि PULL वाचून २ सेकन्ड तरी विचार करतोच,
“च्या आयला दरवाजा खेचायचा की ढकलायचा?”


लहान असताना झोपेत हसलो की आई म्हणायची “सटवाई खेळवते”
आणि आता हसलो तर म्हणते “कोणती सटवी खेळवते ?”


कॉम्पुटर परीक्षेत विचारलेल्या प्रश्नावरील एका मुलाच्या उत्तराने खूप खूप बरं वाटलं …
प्रश्न : प्रोग्राम म्हणजे काय ?
उत्तर : संध्याकाळी बसणे !!!


New Marathi Jokes


सासूबाई नवऱ्या मुलाला विचारतात : वऱ्हाडी मंडळी एवढे आनंदात वेड्यासारखी का नाचू लागलीत?
नवरदेव : कारण त्यांना सांगितले आहे कि हुंड्याच्या पैश्यातून सगळ्यांची उधारी देण्यात येईल ….


वैज्ञानिकांना ८०० वर्ष संशोधन करून सुद्धा आजून माहित नाही पडलं की “भोकाडी” हे असं कोणत जानवर आहे त्याला मराठी मुलांना घाबरवले जाते


गणिताचे शिक्षक स्टाफरूम मध्ये रिकाम्या डब्यात पोळी बुडवून खात होते
मराठीचे शिक्षक म्हणाले – सर डब्यात तर काहीच नाही …
गणिताचे शिक्षक – आम्ही भाजीला “एक्स” मानले आहे !


Latest Marathi Jokes


आमच्याकडे एक कामगार आहे, त्याच्या कामात चूक काढली की त्याचे नेहमीचे वाक्य –
“साहेब लय बारीक बघितलं की बाईला पण मिशा दिसत्यात !”


 जीवशास्त्राचे शिक्षक : सेल म्हणजे शरीरातील पेशी
भौतिकशास्त्राचे शिक्षक : सेल म्हणजे बेटरी
अर्थशास्त्राचे शिक्षक : सेल म्हणजे विक्री
इतिहासाचे शिक्षक : सेल म्हणजे तुरुंग
इंग्रजीचे शिक्षक : सेल म्हणजे मोबाईल फोन
मी तर शिक्षणच सोडून दिले हे समजून की ज्या शाळेत पाच शिक्षकांचे एकमत होत नाही तिथे शिकून काय फायदा
आणि आता खरं ज्ञान मिळालं जेव्हा बायकोने सांगितलं की “सेल” म्हणजे “डिस्काउंट”


New Jokes In Marathi


पेशंट : डॉक्टर, प्लास्टिक सर्जरी करायची आहे, साधारण किती खर्च येईल?
डॉक्टर : ३ लाख रुपयांपर्यंत येईल
पेशंट : (थोडा विचार करून) आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर??
डॉक्टर : मग फेविकॉल पण आणून द्या. फुकट चिकटवून देतो


झाडावर आपल्या गर्लफ्रेंड चे नाव लिह्ण्यापेक्षा तिच्या नावाने एक झाड लावा
गण्या : पटतंय पण किती झाडाचं लिमिट आहे? नाही म्हटलं उगाचच सगळीकडे अभयारण्य व्हायची


Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *