Lahanpan Aani Shahanpan

दोन जिवलग मित्र लहानपण आणि शहाणपण
त्यांच्या मैत्रिचे लोक देत असत उदाहरण

एकावाचून दुसर्‍याला मुळीच करमत नसे
एकाला दुखलं तर दुसरा रडत बसे

लहानपण एकदा खूप मोठं झालं
शहाणपणाशी त्याने मोठं भांडण केलं

लहानपणाला भेटला नवा मित्र अता
दुसरा कोणी नाही तो तर वेडेपणा होता

शहाणपणाने सांगूनही लहानपणाने ऐकले नाही
लहानपण सारा वेळ वेडेपणासंगे राही

एक दिवस लहानपण वेडेपणासोबत निघून गेले
शहाणपण स्वतःच मग एकटे राहून वेडे झाले

कवी : UNKNOWN


View All Marathi Short Poems

Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *