kshamabhaav Ishwariya Denagi…

क्षमाभाव..इश्वरिय देणगी..

 

“तुला समजत नाही का रे, तू एकटाच जॉब नाही करत, मी पण दिवसभर जॉब करुन घर सांभाळते, आले गेले पाहुणे तुझे नातेवाईक, घरातले सगळ्यांची मन सांभाळते, मला कंटाळा येऊ लागलाय बोलून पूजा धाडकण दरवाजा आपटत निघुन गेली.

रोजचीच धावपळ त्यात घरची जबाबदारी, कामाचे टेंशन यामुळे चिडचिड झाली तिची पंकज वर पण ऑफ़िस ला गेल्यावर तिचे कशातच मन लागेना. खरतर चिडण्यासरखे काही झालेही नव्हते. फक्त ओला टॉवेल पंकज ने तिला सुकवायला सांगितलं.

तिचा तिलाच खुप पश्च्ताप झाला. कसतरी काम संपवून पूजा लवकर घरी आली,बघते तर काय पंकज ने जेवण तयार करुन ठेवले होते.डोळ्यातले अश्रू पुसत त्याच्या मिठीत विसावली, तिला वाट्ले खरच किती मोठेपणा हा मनाचा.

क्षमा हिच माणसाची खरी शक्ती. इश्वरिय देणगी.

 

१००शब्दांचिगोष्ट

©®सुवर्णा राहुल बागुल

Liked it? Share with your friends...

You May Also Like

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *