Kiti Pujla Dev Tari

कीती पुजला देव तरी अजुन पावला नाही
कुठं राहतो कुणांस ठाऊक अजुनपर्यंत घावला नाही ।। धृ ।।

मंदिरासमोर लुटली इज्जत हा बघत बसला पोरीला
रक्षण करतो म्हणाला अन् स्वत:च गेला चोरीला
हातात असुन धारदार शस्र कधी चोरामागे धावला नाही
कुठं राहतो कुणांस ठाऊक अजुनपर्यंत घावला नाही ।। १ ।।

सगळं काही तोच देतो तोच पुरवतो सगळ्यांची हौस
शेतक़री बघतो आभाळांकडं मग गेला कुठं पाऊस
खुप केलं हरी हरी तरी मुखांत कधी मावला नाही
कुठं राहतो कुणांस ठाऊक अजुनपर्यंत घावला नाही ।। २ ।।

कधी स्वत: राहून उपाशी भुक त्याची भागवली
हा म्हणे नैवद्यावर थोडी साखर का नाही मागवली
आहार त्याचा वाढतं गेला कधी एका बक-यावर भागला नाही
कुठं राहतो कुणांस ठाऊक अजुनपर्यंत घावला नाही ।। ३ ।।

आंघोळ करतो दुधाने जणू सगळ्याच गाई त्याच्या बापाच्या
तोच घागरी भरतो म्हणे पुण्य अन् पापाच्या
पाप-पुण्याचा हीशोब कधी मला त्यानं दावला नाही
कुठं राहतो कुणांस ठाऊक अजुनपर्यंत मला घावला नाही ।। ४ ।।

आता म्हणे गांव सोडूनं तो ऊंच टेकड्यांवर बसतोय
बघुनं गयेचा बुध्द त्याला गालामध्ये हसतोय
उघडा-नागडा केला तरी भीमावर कधी तो कावला नाही
कुठं राहतो कुणांस ठाऊक अजुनपर्यंत घावला नाही ।। ५ ।।

कवी – डॉ. नरेंद्र दाभोळकर


View All Marathi New Poems

Liked it? Share with your friends...

2 thoughts on “Kiti Pujla Dev Tari

  1. ही कविता डाॅ.दाभोळकरांची नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *