Kay Vichar Kartos Bhauraya Kay Deu Rakshabandhanachi Bhet

काय विचार करतोस भाऊराया, काय देऊ रक्षाबंधनाची भेट?
नको पैसे, नको वास्तू थेट, क्षणभर विसाव्याला महेर दे हीच खरी भेट

भाऊबीजेला तुला बोलावते देऊन आग्रहाचं निमंत्रण
राखी पौर्णिमेचं देशील का तू आमंत्रण?

आई वडिलांची खुशाली अन तुझ्या संसाराचं सुख पाहून भरेल माझे पोट
काय विचार करतोस भाऊराया, काय देऊ रक्षाबंधनाची भेट?

आपुलकीचं बोलावणं करशील का ग वाहिनी?
बहीण भावाच्या नात्यातला रेशमी धागा जपशील ना ग वाहिनी?

नात्यांची भिस्त आता तुजवरच आहे
माझ्यासारखी तू देखील एक स्त्रीच आहेस

प्रेमाचा हिस्सा आणि मायेचा वाटा द्या ना
तुम्ही माझ्याकडे, मी तुमच्याकडे येत राहावे एवढा लोभ  द्या ना

नाती तीच आहेत जरी लग्न करून मी सासरी गेले
डोळे बंद केले अन सारं लहानपणच समोरून गेले

काय विचार करतोस भाऊराया, काय देऊ रक्षाबंधनाची भेट?
नको पैसे, नको वास्तू थेट, क्षणभर विसाव्याला महेर दे हीच खरी भेट

कवी : UNKNOWN

View All Poem On Sister in Marathi

Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *