Kana – कणा

ओळखलंत का सर मला , पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी

क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून
गंगामाई पाहुणी आली गेली घरटात राहून

माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली
मोकळया हाती जाईल कशी बायको मात वाचली

भिंत खचली, चूल विझली होते नव्हते गेले
पसाद महणुन पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले

कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे
चिखलगाळ काढतो आहे , पडक भिंत बांधतो आहे

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून फक लढ महणा !

कवी – कुसुमाग्रज


View All Kusumagraj Marathi Kavita

Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *