Jokes on Sairat Movie

बरं झालं आर्ची घरातून अगोदरच पैसे घेऊन पळून गेली… आता पाळली असती तर नोटा चालल्या नसत्या


मैडम : काय रे एकटाच का हसतोयस? सगळ्या वर्गाला सांग की काय विनोद झाला तो, म्हणजे आम्ही देखिल त्याचा आस्वाद घेउ..!”
बंड्या : मैडम हा तुम्ही आल्यावर “माझी आर्ची आली” असे म्हणाला


आमचं गाण्यापण परश्या सारखं प्रपोज मारायला गेलं आणि बारक्या पोराकडं लव्ह लेटर दिलं. पोरगं परत येऊन म्हणाल…
गानू दादा… गानू दादा… , सुमी दीदी म्हणाली… सुमी दीदी म्हणाली…
चालू हाय दुसरीकडं… तिकडलं बिघडलं की सांगते…


कटप्पा ने बाहुबलीला का मारले त्यापेक्षा खतरनाक प्रश्न
विहिरीत उडी मारण्या अगोदर परश्याने घरी आंघोळ का केली ?


मुलगी : कसं काय आत्या … बरं हाय का ??
मुलाची आई : झिपऱ्या उपटिन झिपऱ्या … पोराला नादी लावशील तर …


आमच गाण्या पण परश्या सारखं प्रपोज मारायला गेलं आणि बारक्या पोराकड लव लेटर दिलं.
पोरगं परत येउन गाण्याला म्हणालं … गणू दादा … गणू दादा
सुमी दीदी म्हणाली …. सुमी दीदी म्हणाली … एन्गेज हाय


उरात व्हतय धडधड लाली गालावर आली, अन अंगात भरलंय वारं ही पिरतीची बाधा झाली
आता अधीर झालोय मग बधिर झालोया, अन तुझ्याचसाठी बनून मजनू माघ आलूया
एवढं गाणं गाताच किचन मधून आवाज येतो
ओ मजनू लग्न झालंय लक्षात आहे ना… मराठीत कळत नसल तर इंग्रजीत सांगू का?


सैराटच्या यशानंतर
पत्रकार : तुम्हाला ही स्टोरी कुठून सुचली?
नागराज मंजुळे : सावधान इंडिया


त्या आर्ची ला सोडा आणि त्या परश्याला पण सोडा
ते चिट्ठी पोहचीवणार कार्टून शोधा राव …. आपले पण लई काम बाकी हायीत


एखादी पोरगी जर बुलेट चालवताना दिसली की प्रत्येकाच्या प्रतिक्रिया अशा उमटतात …
मुंबईकर : काय सैराट बघितलाय वाटत
पुणेकर : सैराट पाहिलेला दिसतोय
सांगलीकर : सैराट झाल्या बघ
फक्त आणि फक्त कोल्हापूरकर : काय बाचा ऊस गेलाय वाटत !


आता तर हद्दच झाली राव … एका लग्नात नवरीने घेतलेला उखाणा
आंब्याच्या झाडाला लागली होती मिर्ची
तू माझा परश्या आणि मी तुझी आर्ची


Jokes on Sairat Movie


मुलगी : कसा होता MPSC Pre चा पेपर?
मुलगा : अवघड
मुलगी : तू संपूर्ण पुस्तक वाचलं होतंस ना?
मुलगा : (वैतागून) तू सैराट पहिला ?
मुलगी : विषय बदलू नको
मुलगा : तू सैराट पहिला का ?
मुलगी : हो पहिला. पुढे बोल
मुलगा : पूर्ण पहिला ?
मुलगी : हो पूर्ण पहिला… इंटरवल च्या जाहिराती पण पहिल्या … आता बोल
मुलगा : मग सांग
प्र १. आर्चीने पहिल्यांदा चित्रपटात कोणती भाजी केली होती?
अ) मेथी ब) शेपू क) भेंडी ड) यापैकी नाही
प्र २. आर्चीने किती ठिपक्यांची रांगोळी काढली होती?
अ) १६ ब) १८ क) २४ ड) २६
प्र ३. बिली बाऊडर ला म्हातारीने किती फटके मारले?
अ) ३ ब) ४ क) ५ ड) ६
प्र ४. इंग्लिश मध्ये सांगू का? हे वाक्य आर्ची किती वेळा बोलते?
अ) ६ ब) ७ क) ८ ड) ९
प्र ५. खूळखुळ्याची फाटलेली चड्डी कोणत्या कंपनीची होती?

मुलगी : खरच खूप अवघड असतात का MPSC चे पेपर ?


हद्द झाली राव सैराटची
जेव्हा एक मित्र बोलला “जुनी मराठी गाणी दे”
मी म्हटलं कशाने देऊ?? तर म्हणाला सैराट ने दे की
मी म्हटलो आरे बाबा सैराट नाही SHARE – it आहे ते


कोणाचे शेत नांगरायचे असेल तर सांगा ….
आर्ची ट्रैक्टर घेऊन गावात आलीया


सासूबाई : आग सुनबाई, लग्नाच्या सर्व विधी पूर्ण झालेल्या आहेत. आता घरी यायच्या आधी नाव घे बघू
सुनबाई : भाजीत भाजी ……
सासूबाई : ओ … हो … सुनबाई, ही पकावगिरी सोडा आता. हे उखाणे जुने झालेत. काहीतरी नवीन दमच घ्या की
सुनबाई : कडू कडू कारलं सासूबाईला चारल, कडू कडू कारलं सासूबाईला चारल
नामदेव रावांचं नावं घेते, सांगा बरे प्रिन्स दादानं आर्ची आन परश्याला का मारलं ?


मुलगा : आई मी जरी आज कमावत नसलो, तरी तुझ्या नजरेत माझी किंमत काय आहे ??
आई : बाळा तुझी किंमत माझ्यासाठी लाखात नाही करोडात आहे …
मुलगा : मग त्या करोड मधील २०० रुपये दे, सैराट बघायला जायचे आहे.
आईने चप्पल टुटेपर्यंत मारला.


Sairat Jokes


प्रेमात पडलेल्या अन पडू इच्छीणाऱ्या “सर्व पोरींनो”
निदान लसुन सोलायला शिका.
सगळ्यांना “परश्या” च भेटेल आसे नाही.


सैराट पिक्चर बघून गण्या घरी गेला…
घरी जाऊन बघतो तर, मेव्हणा चहा पीत बसलेला होता…
गण्या दारातूनच पळून गेला.


गुरुजी : मुलांनो सैराट बघून काय शिकलात?
मुले : मेहुणा पहिला उडवायचा.


सर्दी अशी सैराट झालीय की शिंकताना पण
“आ $$$$ छी” ऐवजी “आर्ची” आसाच आवाज येतोय …


प्रिय पालक,
सप्रेम नमस्कार

आपली पोरं “सैराट” पाहून सैराट सारखी वागू लागली तर कृपया
“मास्तरांनी तुम्हाला हेच शिकवले का” असे विचारू नये.
जे काही विचारायचे असेल ते नागराज मंजुळे यांना विचारावे.

कळावे
आम्ही शिक्षक


सैराट मधल्या लंगड्याच्या सपनीला अटक होणार…
कारण महाराष्ट्रात गुटका बंदी असून देखील ती गुटका विकत होती.


सैराट पाहुन एक गोष्ट समजली….
पळून लग्न केल आणि घरच्याचा विरोध असेल तर चुकून पन घरच्याशी संपर्क करू नये.
गोड बोलून मारत्यात राव…


सैराट बघून आल्यावर गर्लफ्रेन्ड म्हणते…
मी पण पैसे घेऊन पळून आली असती पण तू मला सोडून पैसेच घेऊन पळून जाशील.
– एक धाडसी प्रेमिका


बाहेर जाताना व्यवस्थित मेकअप वैगरे करुन जावा
काही सांगता येत नाही कधी नागराज मंजुळे ची नजर तुमच्या वर पडेल


Sairat Movie Jokes


आमच्या जीवनात न आर्ची, ना मिर्ची
आहे ती फक्त साधी भोळी “घरची”


कंपनी डायरेक्टर आणि कामगारांची मिटिंग चालू असते…
डायरेक्टर : सांगा सैराट मधून तुम्ही काय शिकलात?
पहिला कामगार : सर आयुष्यात आर्ची सारखी मुलगी पाहिजे खरं तर
दुसरा : सर खरं प्रेम या जगात टिकत नाही
तिसरा : सर लव स्टोरी मस्त आहे पण शेवट असा नव्हता दाखवायला पाहिजे
डायरेक्टर : अरे मूर्खांनो दुष्काळ असताना नागराज मंजुळे यांनी ४१ कोटी बाहेर काढले आणि तुम्ही काय करता???
प्रत्येक वेळी दुष्काळाच कारण सांगता… मला धंदा पाहिजे धंदा… बाकी मला काही माहित नाही…
याला म्हणतात खरा सैराट बोध


इंटरव्हयू घेणारा : आम्ही तुम्हालाच का सिलेक्ट कराव???
उमेद्वार : हात भरून आलोया, लई दुरून आलोया, अन करून दाढी भारी परफ्युम मारून आलोया
सम्ध्या पोरांत म्या लई जोरात, रंगात आलोया ….
इंटरव्हयू वाल्याने laptop फेकून मारला


आमचं पण राम याड लागलं म्हणून परश्या सारखं विहिरीत उडी मारायला गेलं …
पाय मोडल्यावर तेला काळाल … विहीर कोरडी होती
आणि खाली आर्ची नव्हती फर्शी व्हती


आम्ही सैराट होण्या आगोदरच आई वडिलांच्या इच्छेनुसार लग्न केलं !
त्यामुळेच आम्हाला आर्ची नाही तर मिर्ची मिळाली !
सर्व Arrange Marriage वाल्यांना समर्पित


Sairat Movie Marathi Jokes

Liked it? Share with your friends...

9 thoughts on “Jokes on Sairat Movie

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *