Javai Sasubai Marathi Jokes SMS

सासूबाई ने आपल्या फौजी जावई बापूला पत्र लिहिले
“माझ्या मुलीला एकट सोडून तुम्ही सिमेवर मौज मस्ती करता आहेत …
गुमानं लवकर माझ्या पोरी पाशी या…
काही पण कारण सांगा पण सुट्टी घ्या ”

फौजी जावई बापुने सासूबाई ला एक हैड ग्रेनेड बॉम्ब सोबत पत्र पाठवले आणि लिहिले
“प्रिय सासूबाई … जर तुम्ही याची पिन खेचली तर मला १३ दिवसांची सुट्टी भेटू शकते”


सासूबाईंना बातमी लागते की मुलीच्या गावाला वादळ झालंय. त्या जावयाला फोन लावतात, “काय जावईबापू काय म्हणताय वादळ?”
जावईबापू : स्वयंपाक करतंय, देवू काय फोन?


सासूबाई : जावईबापू आज सकाळी सकाळी इकडे कसे काय येणे केले?
जावई : आज सकाळीच तुमच्या मुली बरोबर भांडण झाले. ती म्हणाली नरकात जा


नवीन लग्न झालं होत. बायको माहेरी गेली होती. मेव्हणा बहिणीला म्हणजे माझ्या बायकोला न्यायला आला होता. जाताना म्हणाला “दाजी ताईला न्यायला तुम्हालाच यावं लागेल बरं”
मी म्हणालो, “बरं येतो मी”
त्याप्रमाणे एक दिवस वेळ काढून गाडी जुंपली आणि सासुरवाडीला निघालो. निघायला वेळ झाला आणि खेड्यात टेलिफोनचा संबंधच नाही. त्यामुळे “मी येत आहे” कळवायची सोय नव्हती. डायरेक्ट निघून संध्याकाळी सासरवाडीत पोचलो.
“पाव्हणा आला पाव्हणा आला” एकच गलका झाला. चहा पाणी झाले. विचारपूस झाली. सासूबाईंनी ऐन टायमाला मला जे जे आवडतं ते बनवलं. चुलीवर भाजलेली बाजरीची भाकरी, झुणका, वांग्याचं भरीत, मस्त मुरलेलं लोणचं आणि माझा फेव्हरेट उडदाचा पापड आणि कांदा. मस्त बेत होता. सगळे जेवायला बसले पण मला जरा टेन्शन आले कारण सगळ्या लोकांच्या ताटात पापड होता पण नेमका मलाच पापड वाढला नव्हता. उडदाचा पापड म्हणजे आपला आवडता आयटम. मनात बेचैनी वाढत होती. चुलीजवळ सासूबाई बसल्या होत्या आणि तिच्याशेजारी पापड माझ्याकडे आणि मी पापडाकडे बघत होतो. नवीन लग्न झालेलं आणि सासुरवाडीत पहिलाच टाईम आणि बायको पण भिंतीच्या आडाला बसलेली, मागावं कसं??
“करा पाव्हणं सुरवात, कसला विचार करत आहात”, सासरे बोलले. मी म्हटलं “हा हा करा करा…. संध्याकाळी मी आलो त्या वेळी….”
सगळ्यांनी कान टवकारले, “काय झालं काय झालं, काही होतंय काय?”
मी म्हटलं “नाही नाही, काही नाही. मी गाडी सोडली, बैल झाडाखाली बांधत होतो तेव्हा भलं मोठं असली जनावर होतं.
सासरा : साला….. कुठं…..???
महिला मंडळी एका सुरात : आग बाई ग
मी : चांगला विषारी नागच होता.
सासूबाई : बाप रे…. मग
मी : काही नाही मी त्याला चाबकाने दणका दिला अन तो तिकडे पांदीकडे निघून गेला
सासूबाई : बरं झालं रे देवा, केवढा मोठा होता तो साप?
मी : जास्त नाही. मामीपासून ते त्या पापडाच्या पराती इतका लांब होता.
सासू : (चमकून) अरे देवा, जावयाला पापड दिलाच नाही की… काय ग… तुला बी ध्यान नाही का?? घ्या घ्या पापड घ्या
घेतला मी मग


जावई : तुमच्या मुलींमध्ये खूप दोष आहेत
सासूबाई : हो ना…. म्हणूनच तर चांगलं स्थळ नाही मिळालं


जावई सासरवाडीत एक महिना होता… एक दिवस सासूबाईंने वैतागून विचारले – जावईबापू परत कधी जातंय?
जावई : पण का?
सासूबाई : आहो भरपूर दिवस झाले
जावई : आहो तुमची मुलगी तर आमच्याकडे सहा सहा महिने राहते
सासूबाई : पण आम्ही तिचे लग्न करून दिले आहे
जावई : मग मला काय तुम्ही इथे पळवून आणलाय काय? माझे पण लग्न झालेय ना तिच्याशी


Sasubai Javaibapu Jokes


नवरा आपल्या नाराज बायकोच्या माहेरी दररोज फोन करत असतो..
सासूबाई : किती वेळा सांगितले की, ती आता तुमच्याकडे येणार नाही म्हणून. मग दररोज फोन का करता?
जावई : ऐकून छान वाटतं म्हणून…


एका बाईचा जावई खुप काळा होता
सासुबाई : जावईबापू तुम्ही एक महिना इथेच रहा मजा करा आरामात रहा
जावईबापू : अरे वाह सासुबाई या वेळी खुप प्रेम ऊतू चाललेय तुमचे
सासुबाई : आहो प्रेम वैगेरे काही नाही. आमच्या म्हशीचे पिल्लू मेलय. तुम्हाला बघून म्हैस कमीत कमी दूध तर देईल


जावई सासूबाईंना : तुमच्या मुलीने मला दुखी करून ठेवले आहे. मला कधीच सुख देत नाही?
सासूबाई : नशिबाची गोष्ट आहे जावईबापू, इथे तर सर्वच मुले खुश होते


 

Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *