Indradhanu Song Lyrics

आले जणू इंद्रधनू पापण्यात दाटूनी
सभोवती नसे कुणी लाजते मनात मी

पाकळी पाकळी उमलून आली अशी
न कळे मन हे आवरून घेऊ कशी

माझे माझे नावे काही सांगे मलाच मी
गालावर लाज तनु वोहरे शहारुनी

नवी नवी होऊनी का भेटते मलाच मी
आले जणू इंद्रधनू पापण्यात दाटूनी

सभोवती नसे कुणी लाजते मनात मी
नवखे वाटते सारे ते तसेच जरी

लागते कसली हूर हूर गोड उरी
माझे मला अनोळखी भासे उगाच मी

कुणीतरी आज अशी पुढून
भुलवते पुन्हा पुन्हा हासते उगाच मी

आले जणू इंद्रधनू पापण्यात दाटूनी
सभोवती नसे कुणी लाजते मनात मी

Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *