Personal Growth

सुखी आणि यशस्वी आयुष्य जगण्यासाठी आवश्यक सवयी

प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहींना काही उद्देश असतो आणि तो पूर्ण करण्यासाठी आपण जीवाचे रान करत असतो. पण आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपली सध्याची जीवनशैली पुरेशी आहे काय, किंवा ती बदलण्याची वेळ आली आहे का?

जीवनशैलीमध्ये बदल करायचा म्हणजे नक्की काय करायचे? आपल्याला चांगल्या सवयी लावून घ्यायच्या. अर्थातच आताच्या आपल्या सवयी चांगल्या असतीलही. आता आपण चांगल्या सवयी कशासाठी महत्त्वाच्या आहेत हे शोधून काढू. काही थोडेसे बदल करून आपण आपले व्यक्तिमत्व अजूनही सक्षम करू. 

चांगल्या सवयी महत्वाच्या का आहेत?

प्रथम आपण पाहूया की चांगल्या सवयी म्हणजे काय. चांगली सवय म्हणजे परत परत पुनरावृत्त होणारी वर्तणूक जी आपले ध्येय साध्य करण्यात मदत करते. थोडक्यात, चांगल्या सवयी आपल्या दैनंदिन कार्यामध्येच लपलेल्या आहेत.

कधीकधी, स्मरणशक्ती वाढविणे हे आपले धेय्य असू शकते तर कधी निरोगी राहणे किंवा एखादी वाईट सवय सोडणे हे ही आपले ध्येय असू शकते. आपल्या चांगल्या सवयी आपले हे धेय्य पूर्ण करण्यास मदत करतात.

एखादी सवय लागण्यासाठी  साधारणतः २१ ते ३० दिवस लागतात. आणि सवय लागून घेण्यासाठी त्यावर नियमितपणे काम करणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, जर आपल्याला दररोज व्यायामाची सवय सुरू करायची असेल तर आपण दररोज सकाळी 8 वाजता असे करण्याचा ठोस निर्णय घ्या.

चांगल्या सवयी तयार करणे हा ध्येय गाठण्यासाठी एक प्रभावी मार्ग आहे. आता आपण अश्याच काही महत्त्वाच्या सवयींबद्दल चर्चा करणार आहोत.

१. लवकर उठा

जर आपण स्वतःला लवकर जागे होण्यासाठी प्रवृत्त केले तर आपल्या धेय्यपूर्तिसाठी जास्तीजास्त वेळ देता येईल. नैसर्गिकरित्या आपल्याला लवकर जग आली तर आपण खूपच ताजे तवाने राहाल. उदाहरणार्थ रात्री झोपताना खिडकीचे पडदे थोडेसे उघडे ठेवा म्हणजे सकाळी सूर्याची किरणे आपल्याला जागे करतील.

२. पैशांचा जपून वापर करा

पैशांचे व्यवस्थापन हे आपल्या जीवनात खूप महत्त्वाचे आहे आणि एक उत्तम सवय आहे. प्रत्येक महिन्यात आपल्या खर्चावर मर्यादा घाला आणि वाचलेले पैसे invest करा. महिन्याचा जमाखर्च मांडा जेणेकरून आपण आपले अनावश्यक खर्च टाळू शकाल.

३. आपले ध्येय स्पष्ठ ठेवा

आपली ध्येये दृश्यमान करणे म्हणजे त्यांचे स्पष्ट चित्र विकसित करणे आणि या चित्राचा विचार करण्यासाठी नियमितपणे वेळ घालवणे. रोजची १० मिनिटं आपण काय साध्य करू इच्छिता यावर विचार करा. एखाद्या शांत ठिकाणी डोळे मिटून बसा आणि आपली जीवनातील धेय्यावर लक्ष केंद्रित करा.

४. दररोज थोडा व्यायाम करा

दररोजचा व्यायाम शरीर आणि मन या दोघांसाठी फायदेशीर आहे आहे. व्यायाम आपला तणाव दूर करतो उत्साही करतो. एखादी ठराविक जागा शोधा जिथे जाऊन आपण आपले शरीर हलके करू शकू. सकाळचा काही मिनिटांचा व्यायाम आपल्याला पूर्ण दिवसभर उत्साही ठेवू शकतो.

५. वर्तमानात जगा

आपण आपला कितीतरी वेळ भूतकाळाबद्दल किंवा भविष्याबद्दल चिंता करण्यात घालवतो. वर्तमानात जगण्याचा प्रयत्न करा. जेव्हा आपण सद्यस्थितीत जगणे सुरु करता तेव्हा आपण जीवनाचा खराखुरा आनंद लुटण्यास प्रारंभ करता. नियमित ध्यानधारणा (meditation) आपल्याला वर्तमानात जगण्यासाठी मदत करू शकेल. एकदा आपल्याला वर्तमानात जगण्याची सवय झाल्यास आपल्याला ताबडतोब फायदे दिसतील आणि ही सवय कायम राहील.

वरील चांगल्या सवयी आपले लक्ष्य साध्य करण्यास समर्थन करतील त्यासाठी कोणताही मुहूर्त शोधणे गरजेचे नाही. आजपासूनच आपण चांगल्या सवयी आत्मसात करायचा प्रयत्न करून आपले स्वत: चे जीवन अधिक चैतन्यमय करूया.

Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *