Good Morning Marathi SMS Messages

Good Morning is the best way to be in touch with your loved one. Here is the best collection of Good Morning messages in the Marathi language.


सकाळ म्हणजे नवीन दिवस, नवीन सुरवात
काल जे घडले ते विसरून पुन्हा नव्याने आयुष्य सुरु करा
आयुष्य सुंदर आहे त्याला आणखी सुंदर बनवायचा प्रयत्न करा


रात्र संपली, सकाळ झाली
इवलीशी पाखरे 
किलबिल करू लागली
सुर्याने अंगावरची
 चादर काढली
उठा आता सकाळ झाली


कोकिळेच्या मंजुळ सुरांनी फुलांच्या हळुवार सुगंधांनी
आणि सूर्याच्या कोमल किरणांनी ही सकाळ आपलं स्वागत करत आहे
Good Morning


पहाटेच्या धुक्यात हरवल्या वाटा, चोहीकडे पसरल्या गारव्याच्या लाटा
डोंगराआडून दिसू लागली सोनेरी किरणे, लखलखल्या दही दिशा सुंदर त्या प्रकाशाने
जागी झाली दुनिया, बागडू लागले पक्षी, पर्णपटलांवर उमटली दवबिंदूंची नक्षी
सडा सारवणाने अंगणे सारी सजली, नाजुकशा कळ्यांची फुले बघा झाली
देवाचिया दारी घंटानाद झाला, नवी स्वप्ने अन अशा घेऊन दिस नवा उगवला


आकाश कितीही उंच असो, नदी कितीही रुंद असो, पर्वत कितीही विशाल असो
एक लक्षात ठेवा, तुम्हाला या सगळ्यांशी काही देणं घेणं नाही.
तुम्ही आपली चादरीची घडी घाला आणि कामाला लागा… सुप्रभात


गोड माणसांच्या आठवणींनी आयुष्य कसे गोड बनतं,
दिवसाची अशी गोड सुरवात झल्यावर नकळत ओठांवर हास्य खुलतं
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्या


खरे नाते हे पांढऱ्या रंगासारखे असते. कुठल्याही रंगात मिसळले तरी दर वेळी नवीन रंग देतात
पण, जगातील सर्व रंग एकत्र करूनही पांढरा रंग तयार करता येत नाही
अशा सर्व पांढऱ्या शुभ्र, स्वच्छ, प्रामाणिक, जीवाला जीव देणाऱ्या आपल्या माणसांना “शुभ सकाळ”


सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसतो, ती एक देवाची सुंदर कलाकृती असते
तो अंधारावर मिळवलेला विजय असतो, जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते
आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरवात असते


चांदण्यांचा लपंडाव पाहण्यात रात्र केव्हाच उलटून गेली
जिकडे तिकडे गुलाल उधळीत सोनकिरणे घरात आली… Good Morning


सकाळची सुरुवात “कडू” कॉफी ने झाली की दिवस “गोड” जातो


सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात, नाजुक ऊन्हाची प्रेमळ साद
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल
रोज तुमच्या आयुष्यात येऊ दे सुंदर सकाळ…


आनंद प्रत्येक क्षणाचा तुमच्या वाटेला यावा
फुलासारखा सुगंध नेहमी तुमच्या जीवनात दरवळावा
सुख तुम्हाला मिळावे दुःख तुमच्यापासून कोसभर दूर जावे
हास्याचा गुलकंद तुम्चुअ जीवनात राहावा
आणि प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आनंदात यावा
शुभ प्रभात … सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्या


उधाणलेला सागर पाहून मनही उधान होते
मात्र त्याला हि ताकद नेमकी कुठून मिळते
नदी जेव्हा आपले जीवन त्याला अर्पण करते
तेव्हाच त्या सागराला विशालता येते
शुभ सकाळ


Good Morning SMS in Marathi


हा पहाटेचा मंद मंद वारा त्यामध्ये रातराणीचा परिमळ
सारा मनाला माझ्या स्पर्शुन गेला जणू काही  सांगून गेला
त्यामध्ये ते कोकिळेचे गीत माझे चित्त झाले पुलकित
उगवेल हा सुर्य आज फक्त तुमच्यासाठी, साऱ्या तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी
अशी सुंदर सकाळ रोजच जीवनी यावी, तुमच्या प्रसन्न चित्तोनेती खुलून यावी


सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसतो, ती एक देवाची सुंदर कलाक्रुती असते
तो अंधारावर मिळवलेला विजय असतो
जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते
आणि आपल्या आयुष्यातील नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरवात असते


पहाटे पहाटे सकाळची प्रसन्न वेळ, वासुदेवाची मधुर वाणी
मोरपिसाची सुंदर टोपी घालुन दुरुन येणारा घंटीचा घंटानाद्
आरतीचा आवाज, गोट्यातील गायीचे वासरासाठी हंबरणे
पक्षांचा चिवचिवाट सर्वांची आपापली गडबड्
यातुन आजच्या दिवसाची सुंदर सुरवात मंगलमय होऊ दे


ऊजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते,
झोपुन स्वप्न पाहत रहा किंवा ऊठुन स्वप्नाचा पाठलाग करा
पर्याय आपणच निवडायचा असतो, शुभ सकाळ


Marathi Morning SMS


दोन चमचे साखर मैत्रीची, एक चमचा चहा पावडर भेटीची,
मग फक्कड़ उकळ द्या गप्पांची, टाका दुधाची धार हास्याची,
पिऊन तर पहा असल्या पण मैफिलीचा चहा.!


आकाश कितीही उंच असो, नदी कितीही रुंद असो, पर्वत कितीही विशाल असो,
एक लक्षात ठेवा ,तुम्हाला या सगळ्यांशी काही देण-घेण नाही,
तुम्ही उठा, चादरीची घडी घाला आणि कामाला लागा…सुप्रभात!


हा पहाटेचा मंद मंद वारा, त्यामध्ये रात-राणीचा परीमळ सारा
मनाला माझ्या स्पर्शुन गेला, जणु काही सांगुन गेला
त्यामध्ये ते कोकिळेचे गीत, माझे चित्त झाले पुलकित
उगवेल हा सुर्य आज फक्त तुमच्यासाठी, साऱ्या मनीच्या इच्छा तुमच्या पुर्ण करण्यासाठी


जीवनाच्या हिंदोळ्यावर काही क्षण खूप निराशाजनक असतात
त्यात आपण स्वत:ला सावरणं महत्त्वाच असतं
जशी काळोख रात्र सरली की लख्ख पहाट असते
तसं आपण फक्त खंबीर राहण महत्त्वाचं असतं


कोकिळेच्या मंजुळ सुरांनी, फुलांच्या हळुवार सुगंधांनी
आणि सूर्याच्या कोमल किरणांनी ही सकाळ आपलं स्वागत करत आहे.


Marathi Good Morning SMS


गोड माणसांच्या आठवणींनी आयुष्य कस गोड बनत
दिवसाची सुरूवात अशी गोड झाल्यावर नकळंत ओठांवर हास्य खुलतं
शुभ प्रभात .. शुभ दिवस…


उगवला नभी सुर्य अजून एका प्रसन्न सकाळी चराचरात चैतन्य आले अंधारी रात्र कुठे गडप झाली
सोनी पिवळी कोवळी किरणे धरेवर अथांग चहुकडे पसरली खिडकीतून डोकावून हळूच म्हणाली
उठा रे सार्यांनी आता सकाळ झाली


सकाळच्या वेळी एक इच्छा असावी, आपली नाती या वाऱ्यासारखी असावी
जरी दिसत नसली तरी त्यात मायेची उब असावी
शब्दांतही वर्णवता नाही येणार एवढी त्यात आपुलकी असावी
कितीही असले गैरसमज तरीही शेवटपर्यंत ती नव्यासारखी टिकावी
शुभ सकाळ, शुभ दिन


Best Good Morning Messages in Marathi!

The best way to greet your loved ones in the morning is by sending them fabulous good morning messages. An encouraging message just pumps them up and makes them ready for the day! And what better way than greeting your “bae” and sending everyone a memorable message in your native language… If you are a Maharashtrian, then Marathi Planet is your home. This is where you belong!

This is for all Marathi Manoos, for you may get many good morning messages in Hindi but you won’t get many in Marathi.

So here we are, presenting you lovely good morning SMS messages with special quotes for your loved ones in Marathi. We have greeting messages with quotes for everyone, be it your friends, family, colleagues or your special date. Make people who are close to you feel special every morning with our good morning messages in Marathi.

These messages not only bring a smile to their faces but also remind them of you. These “good morning – feel good” SMS messages are one of those ways to show that you care about your relatives, that family and loved ones matter the most to you, and that you take the time out to greet them every morning. Make people realize that every day is a perfect day, it is an opportunity to make it big. And with your message, give them the confidence to make every day their own!

So without much ado, we present to you, thousands of beautiful and expressive “Good Morning messages” in Marathi! Enjoy and spread the happiness!


One thought on “Good Morning Marathi SMS Messages

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *