घरटे उडते वादळात, बीळा वारुळात पाणी शिरते
कोणती मुंगी, कोणतं पाखरू म्हणून आत्महत्या करते?
प्रतिकूल परिस्थितीत हि वाघ लाचारीने जगात नाही
शिकार मिळाली नाही म्हणून कधीच अनुदान मागत नाही
घरकुला साठी मुंगी करत नाही अर्ज
स्वतःच उभारते वारूळ कोण देतो गृहकर्ज
हात नाहीत सुगरणीला फक्त चोच घेऊन जगते
स्वतःच विणते घरटे छान कोणतं पक्येज मागते?
कुणीही नाही पाठी तरी तक्रार नाही ओठी
निवेदन घेऊन चिमणी फिरते का कोणत्या योजनेसाठी?
घरधन्याच्या संरक्षणाला धावून येतो कुत्रा
लाईफ इन्शुरन्स काढला का अस विचारत नाही मित्रा
राब राब राबून बैल कमावून धन देतात
सांगा बर कोणाकडून ते निवृत्ती वेतन घेतात?
कष्ट्कऱ्याची जात आपली आपणही हे शिकलं पाहिजे
पिंपळाच्या रोप सारख पाषाणावर टिकल पाहिजे
कोण करतो सांगा त्यांना पुरस्काराने सन्मानित
तरीही मोर फुलवतो पिसारा अन कोकीळ गाते मंजुळ गीत
मध्माशीची धृष्टी ठेव फुलांची काही कमी नाही
मधाच्या पोळ्यासाठी मित्रा कोणतीच रोजगार हमी नाही
घाबरू नको कर्जाला, भय चिंता फासावर टांग
जिव एवढा स्वस्त नाही सावकाराला ठणकाऊन सांग
काळ्या आईचा लेक कधी संकटापुढे शुक्ल का?
कितीही तापला सुर्य तरी समुद्र कधी सुकला का?
निर्धाराच्या वाटेवर टाक निर्भीड पणे पाय
तू फक्त विश्वास ठेव पुन्हा सुगी देईल धरणी माय
निर्धाराने जिंकू आपण पुन्हा यशाचा गड
आयुष्याची लढाई फक्त हिमतीने लढ
7 thoughts on “Gharte Udte Vadalat”
khupp chan ahe kavita…. fully energetic….
Mast khup chan ahe nice….
mala khup avadali
Khup sundar
!!Wonderful!
Very very nice
खुपच सुंदर.खुप माहिती उपलब्ध आहे.