एकदा तरी फौजीवर प्रेम करून पहा
मनापासून त्याच्यावर तुम्ही मारून पहा
जीवाला जीव देईल तुमच्या त्याचा हात धरून पहा
त्याचं नाव काळजावर एकदातरी कोरून पहा
कसा जगतो एकटा तुम्ही चोरून पहा
प्रेमाचे दोन शब्द त्याच्याशी बोलून पहा
त्याच्या सारख्या यातना एकदा तरी सोसून पहा
अनोळखी जगात तुम्ही एकटे बसून पहा
दुःख असून मनात तुम्ही हसून पहा
त्याच्या सारखे तुम्ही उन्हात उभे राहून पहा
एकदा तरी फौजीवर प्रेम करून पहा
तो रोज मारतो तुम्ही एकदातरी मारून पहा
लेकरासाठी झुरतो तो तसं भेटीसाठी झुरुन पहा
तुम्हाला काय वाटतं तुम्ही फौजीच्या यातना सोसून पहा
एकदा तरी फौजीवर प्रेम करून पहा
मनापासून त्याच्यावर तुम्ही मारून पहा