Eka Talyat Hoti Badke Pile Surekh

एका तळ्यांत होती बदकें पिलें सुरेख
होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक ।।

कोणी न तयास घेई खेळावयास संगे
सर्वांहुनी निराळे ते वेगळे तरंगे ।।

दावूनि बोट त्याला म्हणती हसून लोक
आहे कुरूप वेडे पिल्लू तयांत एक ।।

पिल्लास दु:ख भारी, भोळे रडे स्वतःशी
भावंड ना विचारी सांगेल ते कुणाशी ।।

जे ते तयास टोची दावी उगाच धाक
होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक ।।

एके दिनीं परंतु पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे वार्‍यासवे पळाले ।।

पाण्यात पाहतांना चोरूनिया क्षणैक
त्याचेच त्या कळले तो राजहंस एक ।।

कवी : ग. दि. माडगूळकर


View All Old Marathi Songs Lyrics


Eka Talyat Hoti Song Video

Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *