Draupadi

धर्मस्थापनेच्या उद्देशानं जन्मलेली दिव्यशक्ती… द्रौपदी

 

“कुरुवंशाच्या भयावह विनाशाचं कारण मीच का गोविंद? या महाभयानक युद्धात पांडव सोडता महाराज शांतनूच्या कुरुवंशाचे सगळे कुलदीपक बळी जाणार हे माहीत असूनही युद्धाचा अट्टाहास का?” द्रौपदीने संतापजनक प्रश्न केला.

श्रीकृष्णाने तिची समजूत घातली, “हे युद्ध तुझं कर्तव्य नाही, तुझ्या जन्माचं उद्धिष्ट आहे… धर्मस्थापनेची जबाबदारी घेऊनच तू जन्माला आली आहेस… पती, पुत्र यांच्या मोहमायेपोटी तू युद्धाचा निर्णय बदलुही शकते पण समस्त संसाराच्या कल्याणासाठी आणि अधर्मी, पापी प्रवृत्तीच्या नाशासाठी हे युद्ध गरजेचं आहे…

अधर्मीवृत्तीच्या लोकांकडून ज्या अपमानाला आज तू बळी पडलीयेस, त्याला युगानुयुगे अनेक द्रौपदी बळी पडत राहतील… निर्णय तुझा आहे..” आणि द्रौपदी युद्धाला तयार झाली कारण तिला जाणून चुकले होते आपण सगळेच इथे विशिष्ट उद्देशाने आलेलो असतो, ते आपण पूर्ण केलेच पाहिजे..

 

१००शब्दांचिगोष्ट

©®सुवर्णा राहुल बागुल

Liked it? Share with your friends...

You May Also Like

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *