Diwali SMS in Marathi

रांगोळीनं सजलं घराघराचं अंगण

आंघोळीला घेतलं उटणं आणि चंदन 

लक्ष्मी पूजनाला करू थोरामोठ्यांना वंदन

फराळावाणी गोड करू नात्यांमधलं बंधन

शुभ दीपावली 


यशाची रोशनी किर्तीचे अभ्यंग,
सन्मानाचे लक्ष्मीपूजन समाधानाचा फराळ,
अशा या मंगल दिनी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.


उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन आली आज पहिली पहाट
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी उजळेल आयुष्याची वहिवाट
Happy Diwali


दिपावलीच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा


दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, इडा – पिडा जाऊ दे, बळीचं राज येऊ दे!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!


फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही, सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाहीत
तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असलात तरी दीपावली सारख्या मंगल प्रसंगी
आम्ही तुम्हाला विसरू शकत नाही. Happy Diwali !


तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा


Diwali Wishes in Marathi


पहीला दिवा आज लागला दारी सुखाची किरणे येती घरी
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा


आनंदाचे गाणे गात दिवाळी येते अंगणात,
सुखाची मग होते बरसात तेजाची मिळते साथ
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा


रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समॄध्दीने भरू दे


दिवाळीची आली पहाट, रांगोळ्यांचा केला थाट, अभ्यंगाला मांडले पाट, उटणी, अत्तरे घमघमाट,
लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट, पणत्या दारांत एकशेसाठ, आकाश दिव्यांची झगमगाट!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!


स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!


यशाची रोशनी, समाधानाचा फराळ, मंगलमय रांगोळी, मधुर मिठाई
आकर्षक आकाश कंदिल, आकाश उजळवणारे फटाके
येत्या दिवाळीत हे सगळं तुमच्यासाठी


Happy Diwali Messages in Marathi


लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा, घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा
सोबत आमच्या लक्ष लक्ष दिवाळीच्या शुभेच्छा!


नवी स्वप्ने नवी क्षितिजे, घेउन येवो ही दिवाळी
ध्येयार्पण प्रयत्नांना, दिव्ययशाची मिळो झळाळी
आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो ही दिवाळी


गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला
उधाण येवो तुमच्या आनंदाला अन उत्साहाला
वंदन करू मनोभावे आज त्या मांगल्याला
दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा


फटाके, कंदील अन् पणत्यांची रोषणाई,
चिवडा, चकली, लाडू आणि करंजीची ही लज्जत न्यारी
नव्यानवलाईची दिवाळी येता, आनंदली दुनिया सारी
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!


फटाक्यांची माळ, विजेची रोषणाई पणत्यांची आरास,
उटण्याची आंघोळ रांगोळीची रंगत, फराळाची संगत लक्ष्मीची आराधना,
भाऊबीजेची ओढ दिपावलीचा सण आहे खूपच गोड


Diwali SMS in Marathi Language


 


Diwali Jokes in Marathi


दुपारचा चहा झाल्यावर पत्नी एका हातात Gelucil, Aspirin, Combiflam, Dicliv अशा ५-६ गोळया आणि पाण्याचा ग्लास घेऊन नवऱ्याजवळ जाते

पती :- एवढ्या गोळ्या कशासाठी?

पत्नी :- अरे ! तुझे हातपाय दुखताहेत नं?

पती :- नाही.

पत्नी:- अरे, मग डोकं दुखत असेल !

पती :- नाही.

पत्नी:- अरे, सर्दी, खोकला. …. ताप

पती:- नाही नाही नाही.?

पत्नी:- मग अंग ठणकत असेल

पती:- नाही नाही नाही मला काहीही झाले नाही मी बिलकुल ठीक आहे

पत्नी:- खरंच ?

पती:- हो हो हो, मला काहीही त्रास नाही मी एकदम ठणठणीत आहे.

पत्नी:- चल मग दिवाळीची साफसफाई करायला


नवरा आणि बायको दोघे मिळून दिवाळीसाठी शॉपिंगची यादी बनवत असतात…….

बायको:- सर्वात आधी आपल्याला काय घ्यायच आहे?

नवरा:- लिही “कर्ज”!!


परवाच मोबाईलमधली झेंडूची फुले,आपट्यांची पानं सगळी साफ केली…

आणि कोजागिरीला २०-२५ लिटर दुध गोळा झालं

ते काढून आज मोबाईल स्वच्छ केला,

आता दिवाळीचा फराळ येईल ना !! जागा करून ठेवली..


पुढचे दहा पंधरा दिवस शब्द जपून वापरा
शेव, चिवडा आणि चकली यांना फराळ म्हणतात


आज माझा राशीभविष्यावर पूर्ण विश्वास बसला.
लिहिले होते, ‘वेगळीच उंची गाठाल’.
सकाळपासून शिडीवर चढून पंखे पुसतोय, जळमटं काढतोय!


एका दिवाळीच्या सकाळी आंघोळीला बसल्यावर पतिराज बाथरूमचा दरवाजा अर्धवट उघडून, ओरडून म्हणाले,”अगं या उटण्याचा उग्र वास कसला येतोय…??”

थोडावेळ घरात एकदम शांतता पसरली..!!

पत्नी : अरे देवा..देवा…देवा… काय बाई तुमचा हा वेंधळेपणा…! मी काल दोन पुड्या आणल्या होत्या, एक उटण्याची व दुसरी हिंगाची…!! तुम्हाला अंघोळीसाठी उटण्याची पुड़ी घ्या म्हटले अन तुम्ही हिंगाची पुड़ी उचलली, अन फासली सगळ्या अंगाला…..!!! एव्हढेही कळू नये का एका ऑफिसात जाणाऱ्या सुपेरिन्टेंडेंटला ….????

काय म्हणावं बाई तुमच्या वेंधळेपणाला..???

अरे देवा…!! कसं होईल या संसाराचं…???

बाई बाई बाई …!!!! मी म्हणून संसार करत राहिले…!! जळला मेला बायकांचा जन्म…!!

पती: अग अग किती किंचाळतेस…?? तो हिंगाचा उग्र वास मी सोसतोय…!! तू कशाला एवढं टेंशन घेतेस..???
पत्नी: अहो, तुमच्या त्या उग्र वासाचं जाऊ द्या, मला काही पडले नाही त्याचे पण..!! तुमच्या वेंधळेपणामुळें मी भाजीत उटणे टाकले त्याचं काय…???


बोनसची अवस्था अशी बिकट झाली आहे की महाबळेश्वरला एको पाँईंटला जाउन ‘ बोनस ‘ असं ओरडलं

तर समोरून ‘ बघु नंतर , बघु नंतर , बघु नंतर’ असा रिप्लाय येतो.


छोटू: बाबा, तुम्हाला पण एक टिकल्यांची पिस्तुल घ्या ना.

बाबा: नको रे, माझ्याकडे एक टिकली लावलेली मशिनगन आहे.


 

Happy Diwali SMS messages from us in our own language Marathi

Diwali, also called Deepavali by some, is by far the biggest festival in India. It is the festival of lights, the festival of good prevailing over bad. It is in Diwali that light overcomes the darkness all around, also in our hearts, our emotions and our thoughts. This festival is celebrated by people meeting and greeting their relatives and celebrating togetherness; which is followed by bursting fire crackers and feasting on numerous delicacies!

Amid all this, messaging your relatives who stay far is a very common thing in Diwali. Marathi Planet brings to you some amazing and heart touching SMS messages to send your relatives during Diwali and wishing them ‘Happy Diwali’; all this in your mother tongue Marathi! For all the Maharashtrians and Aamchi Mumbaikars, now you can wish your relatives in Marathi with some fun-loving and wonderful Diwali SMS messages. We have a range of ‘Happy Diwali messages’ in Marathi. The messages could be about how Diwali came into existence or about the significance of this festival.

We also have social messages regarding the pollution that happens every Diwali because of firecrackers and messages with a strict no-no to bursting crackers and having a colorful Deepavali! All these messages are in the native language Marathi. All you have to do is visit our website and copy-paste these Diwali messages to your relatives and friends. Send these messages to your loved ones and spread joy; let them feel your presence and make them realize that you have not forgotten them on this illustrious occasion. We all have some Happy New Year messages attached to Diwali messages, all in Marathi language. And that too, in Shuddha Marathi!

So this Diwali spread happiness and joy in Marathi! Marathi Planet Wishes You A Shubh Deepavali & A Prosperous New Year!

Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *