Kharya Arthane Diwali Aali.

आणि मग वाटलं..खऱ्या अर्थाने दिवाळी आली!!

 

साधनाताई, नेहमीच हर्षउल्हासित राहणाऱ्या, आज रडवेला चेहरा करून बसल्या होत्या… त्यांच्यामुळे वृद्धाश्रमातही कलकलाट असायचा, कुणालाच दुःखी बसू नाही द्यायच्या.

आपण मुलांना जगायला शिकवले मग स्वतःला का नाही शिकवू शकत हा त्यांचा मूलमंत्र! सगळे चिंताग्रस्त झाले, १२ वर्षांपासून त्या इथे आहेत पण आज खूपच नाराज होत्या… तेवढ्यात एक भलीमोठी गाडी गेटसमोर आली, त्यातून २ राजबिंडे पुरुष उतरले…

मुलं होती त्यांची ती… आणि ताईंना म्हणाले, “आई तुला घ्यायला आलोय, आमची चूक आम्हांला कळली… तू आहेस तर सगळं आहे. आम्हाला माफ कर!”हे ऐकून साधनाताईंचा चेहरा खुलला…

आम्ही नाराज, साधनाताई आमच्यासोबत नसणार म्हणून पण आनंदीही कारण खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी दिवाळी आली. आईच शेवटी ती… मुलांना माफ केले आणि जायला तयार झाल्या त्यांच्यासोबत… “पण दिवाळी मात्र दरवर्षी वृद्धश्रमातच साजरी करेन मी” या अटीवर.

 

१००शब्दांचिगोष्ट

©®सुवर्णा राहुल बागुल

Liked it? Share with your friends...

You May Also Like

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *