Dhrushtikon – दृष्टीकोन

Dhrishtikon

एक तरुण आई डायनिंग टेबलपाशी बसून चिंतीत झाली होती. कारण नेहमीचेच. मार्च एन्ड असल्यामुळे Income Tax भरणे भाग होते. घरातील सर्व कामे तर करायची होती वर उद्या होळी च्या निमित्ताने पाहुणे जेवायला येणार होते.

या सगळ्या गोष्टींमुळे ती त्रस्त झाली होती.

जवळच तिची १० वर्षांची मुलगी आपल्या वहीत काहीतरी लिहित होती. तिने मुलीला विचारले. ती म्हणाली “आज टीचर ने होमवर्क दिला आहे. विषय आहे Negative Thanksgiving. आणि सांगितले आहे की आशा गोष्टींवर निबंध लिहा ज्या आपल्याला सुरवातीला आवडत नाहीत पण नंतर आवडायला लागतात.

आईने आश्चर्य व्यक्त करून वही बघायला घेतली. बघूया आपल्या मुलीने काय लिहिलंय?

मुलीने लिहिलं होतं –

मी माझ्या वार्षिक परीक्षेला धन्यवाद देते कारण त्या नंतर उन्हाळी सुट्टी चालू होते …

मी त्या सर्व कडू औषधांना धन्यवाद देते कारण ते घेतल्यावर माझी तब्येत चांगली होते …

मी गजराच्या घड्याळाला धन्यवाद देते कारण पहाटे पहाटे तेच मला जिवंत असल्याचे सांगत असते …

वाचता वाचता आईच्या मनात विचार आला कि अरे माझ्याकडे पण अशा अनेक गोष्टी आहेतच कि ज्यांच्या साठी मी धन्यवाद करू शकते. विचार करता करता खूप बाबी समोर आल्या

Income Tax द्यावा लागतो याचा अर्थ सुदैवाने माझ्याकडे चांगल्या पगाराची नोकरी आहे …

घरी भरपूर काम करावं लागतं म्हणजे माझ्याकडे एक घर, एक आश्रय स्थान आहे …

सनासुधीला  मला खूप माणसासाठी जेवण बनवावे लागते, म्हणजेच माझ्याकडे भरपूर नातेवाईक आहेत जे माझ्या सुख दुःखाचे साथीदार आहेत …

गोष्टीचे तात्पर्य – प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन महत्वाचा …

चला आपणही आता असाच पोझीटीव दृष्टीकोन ठेऊन आपल्या आयुष्यातला प्रत्येक दिवस सोनेरी बनवूया.

Liked it? Share with your friends...

You May Also Like

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *