Dev Majha Vithu Savla Marathi Song Lyrics

देव माझा विठू सावळा
माळ त्याची माझिया गळा

विठु राहे पंढरपूरी, वैकुंठच हे भूवरी
भीमेच्याकाठी डुले भक्तीचा मळा

साजिरे रूप सुंदर, कटि झळके पीतांबर
कंठात तुळशीचे हार, कस्तुरी-टिळा

भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतो
रंगुन जाई भक्तांचा पाहुनी लळा

गीत – सुधांशु
संगीत – दशरथ पुजारी
स्वर – सुमन कल्याणपूर


View All Marathi Bhaktigeet Lyrics

Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *