दर्शन देरे देरे भगवंता
किती अंत आता पहाशी अनंता
माय पित्याची सेवा पुंडलिकाची
भक्ति पाहिली तू गोर्याकुंभाराची
तैसे येणे व्हावे तुझे कृपावंता
ऐकताच वाणी संत चोखोबाची
साक्षात प्रगटे मूर्ति विठ्ठलाची
ऐसे दान देशी तुझ्या प्रिय संता
तूच जन्मदेता तूच विश्वकर्ता
मन शांत होई तुझे गूण गाता
हीच एक आशा पुरवी तू आता