कोरोना वायरस लॉकडाऊन

हो ना….

खूप कंटाळलो आपण गेली काही दिवस घरी बसून पण काही नादान अजूनही बाहेर फिरत आहेतच. विचार करा आपलं काही तरी चुकतंय न हे मात्र नक्की.

शासन रोज एक आदेश देत आहेत जास्त प्रमाणात त्याच पालनही होत आहे. पण काही लोक मुद्दाम काही लोक मजबुरी म्हणून तर काही आपल्या गरजा भागविण्यासाठी भाजी पाला आणायला कोणी पेट्रोल ला तर कोणी अजून काही कामासाठी बाहेर पडतच आहेत. मान्य आहे की गरज आहे म्हणून आपण बाहेर पडत आहेत.

पण आता हा लॉकडाऊन १५ दिवसांनी पुढे जात आहे. आजच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धवठाकरे साहेब यांनी आजच या वाढत्या लॉक डाऊन ची घोषणा केली. आता हे ३० एप्रिल पर्यंत पुढे गेलंय चिंता वाढली आहे.

आपल्या महाराष्ट्रात सर्वात जास्त रुग्ण सापडत आहेत. कारण पुणे आणि मुंबई ही दोन मोठी शहरे सर्वात जास्त बाधित आहेत. यातून ग्रामीण भागात झालेलं मोठं स्थलांतर या मुळे ग्रामीण भागात देखील धोका वाढला आहे. एकदा का ग्रामीण भागात प्रसार झाला तर त्याचा वेग नक्कीच वाढेल म्हणून आपण ग्रामीण भागातील प्रत्येक छोट्या मोठ्या गावात आता कडक बंदोबस्त गावातील प्रतिनिधी शासकीय अधिकारी पोलीस अधिकारी चांगल्या प्रकारे काम करत आहेत.

आता आपण खरच एका लास्ट स्टेज ला जाऊन विचार करण्याची गरज आली आहे. प्रत्येकाच्या घरात कडधान्य असतील,धान्य असेल घरगुती भाजीपाला असेल हे आपण घरच्या घरी उपलब्ध करू शकतो. एखाद्याकडे जास्त असेल आणि टाकून देण्यापेक्षा आपल्या शेजारील लोकांना द्या कारण आता ही भांडण्याची वेळ नाही तर कोरोनासारख्या राक्षसी संकटाशी लढा देण्याची वेळ आली आहे.

आपणच नाही राहिलो तर सर्व काही नश्वर असणार आहे. पैसा संपत्ती आपण पुन्हा कमावू पण हे जीवन पुन्हा नाही म्हणूनच समाज माध्यमांच्या माध्यमातून आपल्याला देखील कळकळीची विनंती आहे की आता तरी जागे व्हा आणि हा ३० एप्रिल चा लॉक डाऊन न कळत वाढला जाऊ नये याची पण दक्षता घ्या…🙏🙏🙏🙏

सुज्ञ महाराष्ट्र देतोय एकतेची साथ
सर्वांनी एकत्र येत करू कोरोनावर मात

तुमचा एक युवा सहकारी…
मयूर संभाजी सरडे

Liked it? Share with your friends...

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *