चल ना, पुन्हा एकदा नातं रिचार्ज करु

आपल्यातलं बोलणं संपलं असेल तर पुन्हा एकदा टॉक टाईम भरु…
चल ना, पुन्हा एकदा नातं रिचार्ज करु…

मनामध्ये काही अडलं असेल तर त्या वाईट गोष्टींना फॉरमॅट मारु…
चल ना, पुन्हा एकदा नातं रिचार्ज करु…

नवा घेवुन पुन्हा कॅनव्हास नव्या चित्रात नवे रंग भरु…
चल ना, पुन्हा एकदा नातं रिचार्ज करु…

प्रेमाचा नेट पॅक,समजुतीच बॅलेन्स हृदयाच्या व्हावचरवर पुन्हा स्क्रॅच करु…
चल ना, पुन्हा एकदा नातं रिचार्ज करु…

उतार-चढाव ते विसरुन सारे उद्यासाठी नात्यांवर पुन्हा टॉर्च मारु…
चल ना, पुन्हा एकदा नातं रिचार्ज करु…

माणुस म्हंटंल तर चुकणारच ना चुका तेव्हढ्या बाजुला सारु…
चल ना, पुन्हा एकदा नातं रिचार्ज करु…

आयुष्याची बॅटरी रोज लो होते गं जवळचे नाते तेवढे आवळुन धरु…
चल ना, पुन्हा एकदा नातं रिचार्ज करु…

व्यक्ती तितक्या प्रकृतीचा नियम पटलं तेवढं ठेवुन बाकी इग्नोर मारु…
चल ना, पुन्हा एकदा नातं रिचार्ज करु…

कांद्याचे कापसुद्धा डोळे भिजवतात नात्यांचेही खाचे तसेच स्विकारु…
चल ना, पुन्हा एकदा नातं रिचार्ज करु…

नव्या ताकदीने नव्या उमेदीने निसटणारे हात पुन्हा घट्ट धरु…
चल ना, पुन्हा एकदा नातं रिचार्ज करु…

कवी – UNKNOWN

Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *