आईचं गुणगान खुप झाले
पण बिचाऱ्या बापाने काय केले ?
बिकट प्रसंगी बापच सदा सोडवी
आपण फक्त गातो आईचीच गोडवी
आईकडे असतील अश्रुचे पाट
तर बाप म्हणजे संयमाचा घाट
आठवते जेवण करणारी प्रेमळ आई
त्या शिदोरीची सोयही बापच पाही
देवकी यशोदेचे प्रेम मनात साठवा
टोपलीतून बाळास नेणारा वसुदेवही आठवा
रामासाठी कौशल्येची झाली असेल कसरत
पुत्र वियोगाने मरण पावला बाप दशरथ
काटकसरत करून मुलास देतो पॉकेटमनी
आपण मात्र वापरी शर्ट पैंट जुनी
मुलीला हवे ब्यूटीपार्लर, नवी साडी
घरी बाप आटपतो बिन साबणाची दाढी
वयात आल्यावर मुले आपल्याच विश्वात मग्न
बापाला दिसे मुलांचे शिक्षण पोरीचे लग्न
मुलाच्या नोकरीसाठी जिना चढून लागते धाप
आठवा मुलीच्या स्थळासाठी उंबरठे झीजवणारा बाप
जीवनभर मुलांच्या पाठी बापाच्या सदिच्छा
त्यांनी समजून घ्यावं हीच माफक इच्छा
4 thoughts on “Bicharya Bapane Kay Kele”
Khup khup Chan kavita
Khup masta kavita aahe
Kharach apn bappa la visartho……
Sry baba……
Hoy, kharach…..
Aatishay Chan kavita aahe.
Sarv Lekhkana Ek vinanti aahe Vadilavaril Kavita please Share karat Ja