Best Marathi SMS Messages

SMS is the best way to express your feelings in less words. Here we present best collected Marathi SMS.


गर्व करून नाती तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा
कारण वेळ आल्यावर पैसे नाही तर माणसंच साथ देतात


चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो
ज्याच्या सोबत असत त्याची किंमत नेहमीच जास्त असते


मी कुणाला आवडो वा न आवडो, दोन्ही गोष्टी माझ्यासाठी चांगल्याच आहेत
कारण, ज्यांना आवडतो त्यांच्या ह्यदयात आणि ज्यांना नावडतो त्यांच्या डोक्यात कायम मी राहतो
जगायचे तर दिव्या प्रमाणे जो राजाच्या महलात आणि गरीबाच्या झोपडीत एक सारखा प्रकाश देतो

 


Nice Marathi SMS


 

प्रत्येकाचे अंदाज वेगळे आहेत म्हणून काही माणसे क्षणभर तर काही आयुष्यभर लक्षात राहतात


लावालावीच करायची असेल तर झाडांची करा


लग्नात वधु-वराला आहेर म्हणून आपण पैशांचं पाकिट देतो,
मग जेव्हा आजारी माणसाला हाॅस्पिटलमध्ये बघायला जातो, तेंव्हा पैशांचं पाकीट का नाही नेत ?
खरंतर त्या आजारी माणसाला मदतीची खूप गरज असते ना?


माणसाचा “मी” बरेच नुकसान करतो
मी का बोलू ?
मी का फोन करू ?
मी का कमीपणा घेऊ ?
मी का नमते घेऊ ?
मी का नेहमी समजून घ्यायचं ?
मी काय कमी आहे का ?
असे बरेच सारे “मी” आहेत जे आयुष्यात विष कालवतात. म्हणून मी पणा सोडा व नाती जोडा.

 


Best Marathi SMS


 

अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारले : विष काय आहे?
भगवान श्रीकृष्ण म्हणाले : जीवनात कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त मिळाली की ती विष बनते. मग ती ताकत असो, गर्व असो, पैसा असो वा भूक असो


सांगण्यापेक्षा समजण्यावर, घेण्यापेक्षा देण्यावर आणि बोलण्यापेक्षा करण्यावर भर असेल तर
ती माणसे विचार कृतीत उतरवतात आणि तिथंच खरी माणसे घडतात


मोत्यांना तर सवयच असते विखुरण्याची पण धाग्याला सवय असते ती सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याची
आपल्या आजूबाजूला खूप सारे मोती असतात त्यांना बांधून ठेवण्यासाठी कधीतरी धागा बनून पहा, आयुष्य खूप सुंदर वाटेल

 


Best Marathi MSG


 

पावसाच्या थेंबाने धरती सुगंधी होते आणि सुखावते!
तसेच चांगल्या माणसांच्या सानिध्याने जीवन आनंदी होते आणि नाते घट्ट होते
म्हणून तुमच्या सारखी चांगली माणसे भेटणे म्हणजे भाग्यच असते
तुमचे प्रेम आपुलकी जिव्हाळा असाच राहो हीच प्रार्थना


‘आनंद’ हा एक ‘भास’ आहे ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे
‘दु:ख’ हा एक ‘अनुभव’ आहे जो प्रत्येकाकडे आहे
तरीही अशा जीवनात तोच जिंकतो ज्याचा स्वत:वर पूर्ण विश्वास आहे


नात्यांना जोडायला प्रेमाची गरज भासते
माणसांना शोधायला विश्वासाची साथ लागते
प्रत्येकाच्या जीवनात येतात वेगवेगळी माणसे
पण तुमच्यासारखी व्यक्ती भेटायला मात्र नशीबच लागते

 


Good SMS in Marathi


 

सोन्यात जेव्हा हिरा जडवला जातो तेव्हा तो दागिना सोन्याचा नाही तर हिऱ्याचा बोलला जातो
तसेच देह हा सुद्धा माणसाचं सोनं आहे आणि कर्म हा हिरा आहे
हिऱ्यामुळे जसं सोन्याचं मूल्य वाढतं तसंच चांगल्या कर्मामुळेच देहाचं मूल्य हि वाढतं


जगाला काय आवडतं ते करू नका, तुम्हाला जे वाटतं ते करा
कदाचित उद्या तुमचं वाटणं जगाची “आवड” बनेल


स्वर्गात सर्व काही आहे परंतु मृत्यू नाही
गीतामध्ये सर्व काही आहे परंतु खोटं नाही
जगात सर्व काही आहे परंतु समाधान नाही
आणि माणसांमध्ये सर्व काही आहे परंतु धीर नाही


इतिहास सांगतो की काळ सुख होतं
विज्ञान सांगते की उद्या सुख असेल
पण माणुसकी सांगते की जर मन खरं असेल आणि हृदय चांगलं असेल
तर दररोज सुख आहे


Sweet SMS in Marathi


हृदयापेक्षा सर्वात चांगली सुपीक जागा कुठेही नाही.
कारण इथे काहीही पेरलं का लगेचच उगवतं म्हणून
पेरण्यापूर्वी विचार करावा मग ते प्रेम असो किंवा राग


काही माणसं तशी साधीच असतात पण त्यांच्या साधेपणात एक मोठेपणा असतो
विचारात एक तेज असते, बोलण्यात नम्रता असते
वागण्यात सौजन्य असते आणि हृदयात असतो स्नेहाचा झरा
अशा माणसांना शुभेच्छा देणे हे देण्याऱ्यासाठी भाग्याचं असते


लहानपणी मी खूप श्रीमंत होतो कारण
या पावसाच्या वाहणाऱ्या पाण्यात माझी पण २,३ जहाज चालायची
मोकळ्या हवेत कागदाची का असेनात स्वतःची विमाने उडवायचो
भले चिखलात का असेना पण स्वतःचा किल्ला असायचा
आता हरवली ती श्रीमंती आणि हरवले ते बालपण


Nice Marathi Status


आवडत्या व्यक्तिपसुन मन दू:खी झाले तर हे वाक्य लक्षात ठेवा –
“दु:ख महत्वाचे असेल तर त्या व्यक्तीला विसरा आणि ती व्यक्ती महत्वाची असेल तर दु:ख विसरा”


या जगात सर्वात मोठी संपत्ती “बुद्धी”
सर्वात चांगल हत्यार “धैर्य”
सर्वात चांगली सुरक्षा “विश्वास”
सर्वात चांगले औषध “हसू”
आणि आश्चर्य म्हणजे हे सर्व विनामूल्य आहे.


Sweet Marathi SMS


माणूस कसा दिसतो यापेक्षा कसा आहे याला जास्त महत्व असतं …
कारण शेवटी,
सौंदर्याचे आयुष्य तारुण्यापर्यंत तर गुणांचं आयुष्य मरणापर्यंत असतं …


जो तुमच्या प्रगतीवर जाळतो त्याचा तिरस्कार कधीच करू नका
कारण तो स्वतः पेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असतो


माणसाने पैश्यापेक्षा जास्त पुण्य कमवावं.
पैसा कमावला तर त्याला ठेवायला जागा करावी लागते
तसं पुण्याचं नाही. ते दिसत नाही पण वेळ आली कि बरोबर समोर उपयोगाला येतं
कारण कमावलेल्या पैश्याचं काम जिथं थांबतं तिथूनच केलेल्या पुण्याचं काम चालू होतं


अशा लोकांचा आदर करा जे त्यांच्या कामातून वेळ काढून तुम्हाला वेळ देतात
आणि अशा लोकांवर प्रेम करा, जे काम बाजूला ठेऊन तुमच्या मदतीला येतात


Best Marathi SMS


कुणावाचून कुणाचे काहीच आडत नाही हे जरी खरे असले
तरी कोण कधी उपयोगी पडेल हेही सांगता येत नाही…
डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि
भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत


ज्याने आयुष्यात पावलोपावली संघर्षाची झळ सोसलीय तीच व्यक्ती नेहमी इतरांना आनंद देऊ शकते,
कारण आनंदाची किंमत त्यांच्या एवढी कुणालाच ठाऊक नसते …


जेव्हा एखाद्याला वाटत असेल की त्याने आयुष्यात एकही चूक केली नाही,
तेव्हा त्याने एकही नवी गोष्ट करून पहिली नाही असे समजावे!


Nice SMS in Marathi


एकदा भगवान श्रीकृष्णास एका भक्ताने विचारले, मृत्यू आणि मोक्ष यात अंतर किती?
श्रीकृष्ण म्हणतात: श्वास पूर्ण झाले आणि इच्छा अपूर्ण राहिल्या तोच मृत्यू!
श्वास बाकी राहिले आणि इच्छा पूर्ण झाल्या तो मोक्ष!


जाळायला काही नसलं कि पेटलेली कडीसुद्धा आपोआप विझते


प्रोब्लेम्स नसतात कोणाला? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर असतच.
ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं!
या तिन्ही गोष्टीं पलीकडला प्रोब्लेम अस्तित्वातच नसतो


माणूस अपयशाला भीत नाही.
अपयशाची खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर? याची त्याला भीती वाटते.


Sweet SMS in Marathi


नाती जपण्यात मजा आहे, बंध आयुष्याचे विणण्यात मजा आहे
जुळलेले सूर गाण्यात मजा आहे, येताना एकटे आलो तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे!


अनुभवाने एक शिकवण दिली आहे,
कुणाच्या चुल उणीवा शोधत बसू नका, देव बघून घेईल तुम्ही हिशोब करू नका
काही जिंकणं बाकी आहे हरण बाकी आहे, आजूनही आयुष्याचे पूर्ण सार बाकी आहे
आपण चाललोय आपल्या ध्येय पुर्तीकडे, आपण पहिल्या पानावर आहे आजून संपूर्ण पुस्तक बाकी आहे


आनंदी राहण्याचा सरळ साधा एकाच उपाय आहे … “अपेक्षा” स्वतःकडूनच ठेवा, समोरच्याकडून नको!


या जगात सर्वात मोठी संपत्ती “बुद्धी”
सर्वात चांगल हत्यार “धैर्य”, सर्वात चांगली सुरक्षा “विश्वास”
सर्वात चांगले औषध “हसू”, आणि हे सर्व विनामूल्य आहे


फळ देणारे झाड आणि गुणवान व्यक्तीच फक्त झुकतात
सुकलेलं झाड आणि मूर्ख व्यक्ती कधीच झुकत नाही
प्रशंसा कर्तुत्वाची होत असते नाहीतर सावली सुद्धा माणसापेक्षा मोठी असते


नशिबाने चांगले होईल असे समजून नशिबाची चाकरी करण्यापेक्षा
कर्तुत्वाला शरण जाऊन कर्तुत्वाची मनोभावे सेवा करा
आणि जिद्ध, कष्ट, स्वाभिमान यांच्याशी मैत्री करा … बघा जीवन कसं बदलून जाईल


Best Marathi Msg


मनाला जिंकायचे असते,”भावनेने”
रागाला जिंकायचे असते, “प्रेमाने”
अपमानाला जिंकायचे असते, “आत्मविश्वासाने “
अपयशाला जिंकायचे असते, “धीराने”
संकटाला जिंकायचे असते, “धैर्याने”
माणसाला जिंकायचे असते, “माणुसकीने”


कर्तृत्ववान माणसे कधी नशिबाच्या आहारी जात नाहीत
आणि नशिबाच्या आहारी गेलेली माणसे कधी कर्तृत्ववान होऊ शकत नाहीत
नशिबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा. यश तुमची वाट पाहत आहे


जिंकायचं म्हटलं की योग्य त्याच वेळेला योग्य तो पत्ता बाहेर काढावा लागतो
नाही तर वेळ चुकली तर हुकुमाचे एक्के पण वाया जातात


वेळ, तब्ब्येत आणि नाती ह्या अशा तीन गोष्टी आहेत की त्यांना किमतीचे लेबल नसते.
पण या गोष्टी हरवल्या की समजते, त्यांची किंमत किती मोठी असते


सगळं जग आपले होईल अशी मैत्री करा. माणुसकी देखील नतमस्तक होईल असे माणूस बना
संपूर्ण जग प्रेमळ होईल असे प्रेम करा, कारण मनुष्य जन्म फक्त एकदाच आहे


Best Marathi SMS


 

Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *