Ashi Pakhare Yeti Marathi Song Lyrics

अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती
दोन दिसांची रंगत-संगत दोन दिसांची नाती

चंद्र कोवळा पहिलावहिला झाडामागे उभा राहिला
जरा लाजुनी जाय उजळुनी काळोखाच्या राती

फुलून येता फूल बोलले मी मरणावर हृदय तोलले
नव्हते नंतर परि निरंतर गंधित झाली माती

हात एक तो हळु थरथरला पाठीवर मायेने फिरला
देवघरातिल समईमधुनी अजून जळती वाती

कुठे कुणाच्या घडल्या भेटी गीत एक मोहरले ओठी
त्या जुळल्या हृदयांची गाथा सूर अजुनही गाती

– मंगेश पाडगांवकर


View All Marathi Bhavgeet Lyrics

Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *