Are Khopyamadhi Khopa

अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं
झोका झाडाले टांगला ..!

पिलं निजले खोप्यात
जसा झुलता बंगला
तिचा पिलामधि जीव
जीव झाडाले टांगला ..!

सुगरिण सुगरिण
अशी माझी रे चतुर
तिले जल्माचा सांगती
मिये गण्यागम्प्या नर ..!

खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारागिरी
जरा देख रे माणसा ..!

तिची उलूशीच चोच
तेच दात, तेच ओठ
तुले दिले रे देवानं
दोन हात, दहा बोटं..!

कवी : बहिणाबाई


View All Bahinabai Chaudhari Kavita

Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *