Agle Janam Mohe Bitiya hi Kijo…

अगले जनम मोहें बिटीया ही किजो!!

विषय- पुनर्जन्म मिळाला तर!!

मी नेहमी म्हणायचे, पुनर्जन्म मिळाला तर मी पुरुषच होईल… नको ते स्त्रीचं आयुष्य, नको तो दर महिन्याचा त्रास, वेळेची बंधनं, मुलीला कशाला एवढं शिकवायचं या मानसिकतेचा त्रास, स्त्रीला कमी लेखणाऱ्या नजरा, तिला घरकाम आलंच पाहिजेचा अट्टाहास, नको ते आपले आईबाप, आपलं घर सोडून दुसऱ्यांच्या घरी जाणं, नको तो बाळांतपणातला त्रास…

हळूहळू जशी मोठी होत गेले, तसं जाणवलं पुरुषांचा जन्मही काही सोपा नाही हं! आणि माझ्या बाळंतपणरुपी “पुनर्जन्मातच” मला समजलं की स्त्री जन्मापेक्षा सुंदर काहीच नाही… स्वतःमधे एक जीव वाढवणे आणि मरणोन्मुख यातना सहन करून त्याला जन्म घालणं, बाळाला बघून त्या सगळ्या वेदना क्षणात विसरणं ही दिव्य सहनशक्ती स्त्रीलाच दिलीये देवाने…

आता मी गर्वाने म्हणते खरंच पुनर्जन्म मिळत असेल तर मी एक स्त्री म्हणूनच जन्म घेईन!

१००शब्दांचिगोष्ट

©®सुवर्णा राहुल बागुल
Liked it? Share with your friends...

You May Also Like

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *