Aalay Paus Thodi Piun Ghya

थोडा बियरचा गंध घ्या थोडा चकण्याचा छंद घ्या
उरात भरून आनंद घ्या, आलाय पाऊस थोडी पिऊन घ्या

बघा बियर बार उसळतोय, वारा दारू घुसळतोय
तुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या, आलाय पाऊस थोडी पिऊन घ्या

सर्दी पडसे रोजचेच, त्याला औषध तेच तेच
प्यायचेच आहेत नंतर काढे आधी अमृत पिऊन घ्या, आलाय पाऊस थोडी पिऊन घ्या

बघा निसर्ग बहरलाय, गारव्याने देहही शहारलाय
मनही थोडं मोहरून घ्या, आलाय पाऊस थोडी पिऊन घ्या

कवी : UNKNOWN


View All Marathi Kavita on Rain

Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *