Marathi Ukhane For Bride

रातराणीच्या सुगंधाने आसमंत झाला मोहीत …… रावांना आयुष्य मागते सासूसासऱ्या सहीत


नमस्कार फुकाचा आशीर्वाद लाखाचा …… रावांच्या बरोबर संसार करीन सुखाचा


सावित्रीने नवस केला पती मिळावा सत्यवान …… रावांच्या जीवावर मी आहे भाग्यवान


नाजूक अनारसे साजुक तुपात तळावे …… रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे


युद्धा मध्ये युद्ध झाले महाभारती …… रावांच्या संसारात मी आहे सारथी


Ukhane in Marathi for Brides


जन्म दिला मातेने पालन केले पित्याने,
…. रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने


जशी आकाशात चंद्राची कोर
….. पती मिळायला माझे नशीब थोर


हिरवा श्रावण बहरलाय दरवळली माती,
…. रावांच्या जीवनात सदैव मिळो शांती


केले देते सोलून पेरू देते चोरून
XXXX रावांच्या जीवावर कुंकू लावते कोरून


निळ्या निळ्या आकाशात शोभुन दिसतात चंद्र-तारे
….रावांच्या संगतीने उजळेल माझे जीवन सारे


ग़ूलाबाचे फुल दिसायला ताजे
…. रावांचे नाव घेते सौभाग्य माझे


जेजुरीचा खंडोबा तुळजापूरची भवानी
…. रावांची आहे मी अर्धागीनी


Modern Marathi Ukhane for Bride


माता पित्यांच्या छायेत फुलासारखी वाढले,
आजच्या दिनी …. रावांच्या चरणावर जीवन पुष्प वाहिले


शब्दा शब्दानी बनते वाक्य, वाक्या-वाक्यानी बनते कविता
….. राव माझे सागर अन मी त्यांची सरिता


काचेच्या बशीत बदामाचा हलवा
…. रावांचे नाव घेते सासुबाईंना बोलवा


मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा रुपाचा
…. रावांना घास भरविते श्रीखंडपुरीचा


जेथे सुख, शांती, समाधान तेथे लक्ष्मीचा वास
…. रावांना भरविते श्रीखंडाचा घास


Marathi Ukhane for Wife


रुसलेल्या राधेला कान्हा म्हणतो हास
….रावांना भरवते पुरणपोळीचा घास