Business Tips

स्वतःचा व्यवसाय सुरु करा आणि यशस्वी व्हा

स्वतःचा व्यवसाय सुरु करा आणि यशस्वी व्हा – १३ टिप्स

स्वतःचा व्यवसाय सुरू करीत आहात? आजच्या या blog मध्ये १३ महत्त्वाच्या स्टार्टअप टिप्स आहेत ज्या आपल्या व्यवसायाला यशस्वी करण्यात मदत करतील.

व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला काय करण्याची आवश्यकता आहे? या विषयावर डझनभर ब्लॉग्स उपलब्ध आहेत आणि १०० च्या वर चेकलिस्ट आहेत. पण यामध्ये महत्त्वाचे काय आहे? या ब्लॉग मध्ये अवांतर चर्चा न करता एकदम महत्त्वच्या गोष्टी नमूद केल्या आहेत. फक्त कल्पना चांगली असून चालत नाही, त्याच्या सोबतीला एक उत्कृष्ट नियोजन आणि जिद्ध गरजेची आहे.

चला तर पाहूया एक नवीन startup पूर्णत्वाकडे नेण्यासाठी काय काय गोष्टींची आवश्यकता आहे ते

१. स्वत: ला जाणून घ्या:

तुमची motivation लेवल, आपण किती जोखीम घेऊ शकता आणि यशस्वी होण्यासाठी आपण काय करण्यास इच्छुक आहात हे जाणून घ्या. निश्चितच, आपल्या सर्वांना लाखो रुपये कमवायचे आहेत. पण त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपण काय सोडण्यास तयार आहात? आपण सतत आठवड्यातून किती तास काम कराल? कंफर्ट झोन पासून दूर राहू शकाल काय? यशस्वी होण्यासाठी आपला business plan आणि आपले वैयक्तिक आणि कौटुंबिक उद्दीष्टे यांच्याशी समतोल ठेवणे गरजेचे आहे.

२. योग्य व्यवसाय निवडा:

तुमच्या ग्राहकाची गरज काय आहे आणि तुमचे product ती गरज भागवू शकेल काय याबाबत विचार करून योग्य तो व्यवसाय निवडा. आणि हो, तुम्हाला त्यामध्ये योग्य ती माहिती किंवा अनुभव असेल तर उत्तमच.

३. बाजारपेठेबद्दल खात्री करून घ्या:

आपल्याला काय विकायचे आहे यासाठी खरोखर बाजार आहे याची खात्री करा. Assumption वर कोणतेही पाऊल उचलू नका. एखादी कल्पना चांगली आहे किंवा ती २-३ लोकांना आवडली आहे म्हणून व्यायसाय चालू करू नका. याबाबतचे योग्य संशोधन करा आणि खात्री असेल तरच पुढचे पाऊल उचला. Market Research ही खूप महत्वाची स्टेप आहे. आपल्या कुटूंबा आणि मित्र मंडळी व्यतिरिक्त इतर लोकांशी बोला. आपल्याला काय विकायचे आहे आणि ते त्यांना खरेदी करण्यास आवडेल की नाही हे शोधा आणि मग योग्य तो निर्णय घ्या.

४. स्पर्धकांवर संशोधन करा:

आपण कोणत्याही प्रकारचा व्यवसाय सुरू करा, आपल्याकडे प्रतिस्पर्धी असणारच. यशस्वी होण्यासाठी, आपण स्पर्धेचे संशोधन केले पाहिजे आणि ते काय विकतात आणि कसे विकतात याबद्दल जास्तीत जास्त शोध घेण्याची आवश्यकता आहे. नियमित competitor research करणे हे आपला व्यायसाय सुरळीत चालू राहण्यासाठी आणि आपल्या उद्योगातील नवनवीन शोध यासाठी महत्वाचे आहे.

५. कार्यरत (Operational) गरजा जाणून घ्या:

आपले प्रतिस्पर्धी काय विकतात आणि कसे विकतात या व्यतिरिक्त आपला व्यवसाय वास्तविकपणे कसा चालविला जाईल याबद्दल विचार करणेही तितकेच महत्वाचे आहे. उदाहरणार्थ, उत्पादनाची आवश्यकता, वितरीत योजना, ग्राहक सेवा, पेमेंट मेथड, दैनंदिन लेखा, आपली वेबसाइट आणि सोशल मीडिया उपस्थिती, इत्यादी आणि बरेच काही. या क्रिया कोण करेल, यासाठी बाहेरील सहाय्यक किंवा कर्मचार्‍यांची गरज आहे काय यावर विचार करावा लागेल.

६. विलंब करू नका:

काही जण त्यांचा व्यवसाय सुरू करण्याच्या शेवटच्या तपशिलाची तपासणी करेपर्यंत एकही पाऊल उचलत नाही. यामुळे विलंब होतो. व्यवसाय सुरू करताना सर्वच गोष्टी एकाच वेळी उपलब्ध असण्याची गरज नाही. जर काही ठराविक गोष्टींच्या माध्यमातून सुरवात होऊ शकेल तर “शुभस्य शीघ्रम”.

७. छोट्या प्रमाणावर प्रारंभ करा:

व्ययसाय म्हटलं की जोखीम ही आलीच. परंतू जोखीम टाळण्यासाठी छोट्या प्रमाणावर एखाद्या कल्पनेची चाचणी घ्या, जर यशस्वी व्हाल तर मग मोठ्या प्रमाणात काम सुरु करा.

८. चुकांपासुन शिका:

चुकांचे निराकरण करू नका किंवा त्यांपासून नैराश्य येऊ देऊ नका. नेहमी असे पहिले गेलेले आहे की यशस्वी लोक त्यांच्या चुकांपासून शिकतात आणि पुढे जातात. ते अपयशावर लक्ष ठेवत नाहीत, अर्थव्यवस्थेला किंवा त्यांच्या नशिबाला दोष देत नाहीत. त्यांच्या मार्गामध्ये अडथळा आला तर ते दुसरा मार्ग शोधतात.

९. इतरांकडून शिका:

मार्गदर्शक शोधा, समविचारी लोकांसह गटात सामील व्हा, आपल्या उद्योगाबद्दल आपण जाणून घ्या. Conference मध्ये भाग घ्या. तज्ञांची पुस्तके वाचा किंवा त्यांच्याकडून प्रशिक्षण घ्या.

१०. गुंतवणूकदारांबद्दल माहिती घ्या:

व्यवसायाचा प्रारंभ करताना किंवा त्याला उच्च पदावर घेऊन जाण्यासाठी गुंतवणूकदारांची गरज भासू शकते. गुंतवणूकदार शोधून काढा, त्यांनी घेतलेल्या सभांमध्ये किंवा गुंतवणूकदार ज्या सभेत बोलतात त्यामध्ये भाग घ्या. आपले व्यायसायाचे proposal तज्ञांकडून बनवून घ्या आणि सादरीकरणाची तालीम करा.

११. डिजिटल मार्केटिंग आत्मसाथ करा:

आपण जरी एखादा स्थानिक व्यवसाय चालवत असलात तरीही आपल्यास डिजिटल मार्केटिंगची आवश्यकता आहे. कमीतकमी आपल्याला एक वेबसाइट आणि एक ईमेल आयडी आवश्यक आहे. सोशल मीडिया चॅनेलवर आपली मजबूत उपस्थिती ठेवा. संभाव्य ग्राहक आपल्याशी व्यवहार करण्याआधी ते आपल्याला वेबवर पाहतील. सोशल मीडिया चॅनेलवर संशोधन करतील.

१२. कायदेशीर बाबी पूर्ण करा:

प्रथमच कायदेशीर बाबी आणि टॅक्स बाबत संवेदनाक्षम राहा आणि योग्य ते परवाने मिळवून घ्या. आपला व्यवसाय नोंदणीकृत करणे आवश्यक असेल तर करून घ्या.

१३. उत्साही (Passionate) बना:

आपण काय करीत आहात याबद्दल उत्साही व्हा. आपल्याला आपल्या व्यवसायाच्या प्रत्येक पैलूवर प्रेम करण्याची गरज नाही पण त्याबद्दल उत्सुकता आणि शिकण्याची जिद्ध असल्यास उत्तम. छोट्याशा उद्योगाचे मोठ्या व्यवसायात रूपांतर करताना आपण बराच वेळ आणि शक्ती खर्च करणार आहात, म्हणून आपण खरोखर काय केले आहे त्याचा आनंद घ्या.

Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *