Whatsapp Marathi Msg Messages

WhatsApp अभंगवाणी
एकाचा मेसेज घ्यावा । त्वरित दुसऱ्यासी धाडावा ।
खंड पडो न द्यावा । क्षण एका
लोक म्हणोत कोण हा प्राणी । मेसेज धाडतो क्षणोक्षणी ।
निरुद्योगी की बिनकामी । हा कवण असे
ऐसा मिळवावा लौकिका । तरीच म्हणावे सार्थका ।
अन्यथा जीणे निरर्थका । होतसे लोकी


WhatsApp वाणी
जे जे आपणासी ठावे । त्वरित दुसर्यांसी पाठवावे
येडे करून सोडावे सकळ जन


रोज WhatsApp वर येणार Good Morning मेसेज जेव्हा अचानक बंद होतो
१ ला दिवस : विसरला वाटतं
२ रा दिवस : बाहेरगावी गेला असेल
३ रा दिवस : आजारी तर नसेल ना?
४ था दिवस : नक्की काहीतरी गडबड असणार
तुमचा केवळ एक Good Morning मेसेज सुद्धा तुम्ही सोबत असल्याची पावती देऊन जातो


अनुभवाने एक शिकवण दिली आहे
कुणाच्या चुका उणीवा शोधत बसू नका, नियती बघून घेईल हिशोब तुम्ही करू नका
काही जिंकण बाकी आहे, काही हरण बाकी आहे, अजूनही आयुष्याचे पूर्ण सार बाकी आहे.
आपण चाललोय आपल्या ध्येय पूर्ती कडे, आपण पहिल्या पानावर आहोत, आजून संपूर्ण पुस्तक बाकी आहे


जो चांगल्या वृक्षाचा आधार घेतो त्याला चांगली सावली लाभते,
म्हणून नेहमी चांगल्या व्यक्तींच्या सहवासात राहणे योग्य!
स्वतःसाठी सुंदर घर करणे हे प्रत्याकाचे एक स्वप्न असते पण,
एखाद्याच्या मनात घर करणे यापेक्षा सुंदर काहीच नसते!


Whatsapp Marathi Msg


सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला तरी तो धोकेबाज कधीच नसतो ….
त्यामुळेच तर चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक हे असतातच


समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असून ते अंतःकर्णाची संपत्ती आहे …
ज्याला हि संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो …
दुसऱ्याच हिसकावून खाणाऱ्याचे पोट कधीच भारत नाही आणि
वाटून खाणारा कधी उपाशी राहत नाही


Marathi Whatsapp Messages


कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून त्याच्या भविष्याची खिल्ली उडवू नका कारण
काळ इतका ताकदवान आहे की तो एका सामान्य कोळश्यालाही हळू हळू हिरा बनवतो


ज्या माणसामध्ये दुसऱ्याला मोठे होताना बघायचे सामर्थ्य आणि
दुसऱ्याला मोठे करायची उर्मी आस्ते तीच माणसे खऱ्या अर्थाने
खूप मोठ्या उंचीवर जाऊन यशाचे शिखर सर करतात ….


नातं ते टिकते ज्यात शब्द कमी आणि समाज जास्त,
तक्रार कमी आणि प्रेम जास्त, अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त आसतो


Whatsapp Messages In Marathi


सत्य हि अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच गुंतवणूक करून आयुष्यभर उपभोगता येते.
पण “असत्य” हे असे कर्ज आहे ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते …


माणसांची नाती हि गोंडस रोपांसारखी असतात…
रोपांना प्रेमाने पाणी घातले, जिव्हाळ्याचे जिवामृत दिले, सन्मानाचा सूर्यप्रकाश दिला तर, रोप बहरू लागतात,
यात काटकसर केली की ती कोमजू लागतात,
चला नाती रोपांप्रमाणे फुलवू या अन येणारा प्रत्येक क्षण आनंदात घालवूया


Marathi Messages For Whatsapp


समस्या नावाची वस्तूच अस्तित्वात नसते…
एक विशिष्ट परिस्थिती निर्माण होते आणि त्यात तारतम्याने वागायचे असते.


त्याचप्रमाणे एक माणूस दुसऱ्या माणसाच्या
संदर्भात एका ठराविक मर्यादे पर्यंतच विचार करू शकतो किंवा मदत करू शकतो.


म्हणून एवढ्यासाठीच कुणालाही बदलणाऱ्या खटाटोपात माणसाने पडू नये.
असह्य झालं तर अलिप्त व्हावं, उपदेशक होऊ नये.
दुसऱ्याचे प्रश्न सोडवताना तुम्ही त्याची बुद्धी वापरून त्या समस्येकडे बघूच शकत नाही. तुम्ही तुमचाच तराजू वापरता.


काल एका फळ विक्रेत्याकडे थांबलो होतो.
मी विचारले: आज काय भाव आहे द्राक्षाचा?
तो म्हणाला: साठ रुपये किलो
जवळच सुट्टी द्राक्षे ठेवलेली होती. मी त्याला विचारले: ह्यांचा काय भाव?
तो म्हणाला: पंचवीस रुपये किलो
मी विचारले इतका कमी कां?
तो म्हणाला: साहेब, ही खूप चांगली द्राक्षे आहेत पण आपल्या घडातून तुटलेली आहेत.
मी समजून गेलो… आपल्या जवळच्यांपासून वेगळे झाल्यावर आपली किंमत कमी होऊन जाते,
म्हणून एकसंघ राहा


Marathi Message for Whatsapp


तुमच्यासाठी कोणी पैसे खर्च करेल तर कोणी वेळ खर्च करेल
जो वेळ खर्च करेल त्या व्यक्तीला अधिक महत्त्व आणि सन्मान द्या कारण
ती व्यक्ती तुमच्यासाठी आपल्या जीवनातील ती वेळ खर्च करत असतो जी त्याला कधीही परत मिळणार नाही


ठेचा तर लागत राहतीलच ती पचवायची हिम्मत ठेवा
कठीण प्रसंगात साथ देणाऱ्या माणसांची तुम्ही किंमत ठेवा


पैसे असणाऱ्या श्रीमंत आणि प्रतिष्ठित माणसाकडेच आदराने पाहू नका
जगातील सर्व महान आणि प्रचंड कामे गरिबांनीच केली आहेत

Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *