Virtual Romance Vinodi Kavita

शुक्र तारा, मंद वारा, गूगल वर Weather पहा
वायफाय आहे, ब्रॉडबैंड आहे, चांदणे स्क्रीनवर पहा
फेसबुक वरती शेअर करुनी माझी तू काँमेंट पहा
तू सदा ऑनलाइन रहा

मी कशी फेसबुक वर सांगू भावना माझ्या तुला
तू मला समजुन घे रे WhatsApp वरूनी साजणा
मेसेजिंगचा छंद माझा आज तू पुरवून पहा
तू सदा ऑनलाईन रहा

लाजरा तू फ्रेंड माझा मेसेंजर उघडून पहा
व्हायबर आणि स्काईप वरुनी तू माझ्या डोळ्यात पहा
हेडफोन आणि माईक लावुनी तू आता युट्यूब पहा
तू सदा ऑनलाईन रहा

शोधिले मी नेटवरुनी पीसी टॅब मोबाईल वरी
फ़ोटो बनुनी आलास तू रे आज माझ्या फेसबुक वरी
भरलिस माझी रँम सारी हँग झाले मी पहा
तू सदा ऑनलाईन रहा

कवी : UNKNOWN


View All Marathi Vinodi Kavita

Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *