Marathi Mhani

अंगात नाही बळ आणि चिमटा घे‌उन पळ

अंगापेक्षा बोंगा जास्ती

अंगाले सुटली खाज, हाताले नाही लाज

अंगावरचे लेणे, जन्मभर देणे.

अंथरूण पाहून पाय पसरावेत.

अंधळं दळतं अऩ कुत्र पिठ खातं.

अंधारात केले पण उजेडात आले.

अंधेर नगरी चौपट राजा.

अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे.

अक्कल खाती जमा.

अक्कल ना बक्कल, गावभर नक्कल.

अग अग म्हशी, मला कुठे गं नेशी.

अग माझे बायले, सर्व तुला वाटिले.

अठरा विश्व दारिद्र त्याला छत्तीस कोटी उपाय.

अडला हरी गाढवाचे पाय धरी.

अडली गाय खाते काय.

अडाण्याची मोळी, भलत्यासच मिळी.

अती तिथं माती.

अती राग भिक माग.

अती शहाणा त्याचा बैंल रिकामा.

अनुभवल्याशिवाय कळत नाही चावल्याशिवाय गिळत नाही.

अपापाचा माल गपापा.

अर्धा वैद्या मरणास खाद्य.

अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे.

अल्प बुध्दी, बहु गर्वी.

अळी मिळी गुपचिळी.

अवघड ठिकाणी दुखणे आणि जाव‌ई डॉक्टर.

असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ.

असतील मुली तर पेटतील चुली.

असतील शिते तर जमतील भूते.

असेल दाम तर हो‌ईल काम.

आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे.

आंधळीपेक्षा तिरळी बरी.

आ‌ई म्हणते लेक झाले, भा‌ऊ म्हणतात वैंरी झाले.

आ‌ईची माया अन पोर जा‌ईला वाया.

आग रामेश्वरी अऩ बंब सोमेश्वरी.

आग लागल्यावर विहीर खणणे.

आगीशिवाय धूर दिसत नाही.

आडात नाही तर पोऱ्ह्यात कोठून?

आधिच कामाचा कंटाळा त्यात माहेरचा सांगावा.

आधी करा मग भरा.

आधी जाते अक्कल मग सुचते शहाणपण.

आधी नमस्कार मग चमत्कार.

आधीच उल्हास त्यातून फाल्गुन मास.

आधीच दुष्काळ त्यातून ठणठण गोपाळ.

आधीच नव्हती हौस त्यात पडला पा‌ऊस.

आपला हात, जग्गन्नाथ.

आपली पाठ आपल्याला दिसत नाही.

आपलीच मोरी अनं अंघोळीची चोरी.

आपले ते प्रेम, दुसऱ्याचे ते लफडे.

आपले नाही धड नाही शेजाऱ्याचा कढ.

आपलेच दांत अऩ आपलेच ओठ.

आपल्या हाताने आपल्याच पायावर दगड.

आय नाय त्याला काय नाय.

आयजीच्या जीवावर बायजी उदार, सासूच्या जीवावर जाव‌ई उदार.

आयत्या बिळात नागोबा.

आराम हराम आहे.

आरोग्य हीच धनसंपत्ती.

आली अंगावर, घेतली शिंगावर.

आली चाळीशी, करा एकादशी.

आलीया भोगासी असावे सादर.

आले मी नांदायला, मडके नाही रांधायला.

आधी पोटोबा मग विठोबा

आवळा देवून कोहळा काढणे.

आवा निघाली पंढरपुरा, वेशीपासुन आली माघारा.

आशा सुटेना अन देव भेटेना.

ओठात एक आणि पोटात एक.

ओठी ते पोटी.

ओल्या बरोबर सुके जळते.

ओळख ना पाळख अनं मला म्हणा लोकमान्य टिळक.

औषधावाचून खोकला गेला.

अंगात नाही बळ आणि चिमटा घे‌उन पळ.

अंथरूण पाहून पाय पसरावेत.

अंधळं दळतं अऩ कुत्र पिठ खातं.

उंटावरून शेळ्या हाकणे

उंटावरचा शहाणा

एका हाताने टाळी वाजत नाही

कामापुरता मामा

काखेत कळसा गावाला वळसा

कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही

कोल्हा काकडीला राजी

कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ

कुंपणानेच शेत खाणे

कर नाही त्याला ड़र कशाला?

करायला गेलो एक आणि झाले भलतेच.

करावे तसे भरावे.

कळते पण वळत नाही.

कशात काय अन फाटक्यात पाय.

कशात ना मशात, माकड तमाशात.

कष्ट करणार त्याला देव देणार.

काम ऩ धंदा, हरी गोविंदा.

कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच.

गंगा वाहते तोवर हात धुवून घ्यावे.

खायला काळ भुईला भार

गाढवं मेलं ऒझ्याने अन शिगरू मेलं हेलपाट्याने.

गुरवाचे लक्ष निविद्यावर (नैवेद्यावर).

गर्जेल तो पडेल काय?

गाढवाला गुळाची चव काय

घोडामैदानजवळ असणे

डोंगर पोखरून उंदीर कढणे

चव ना ढव म्हणे खंडाळ्या पोटभर जेव.

चांदणे चोराला, उन घुबडाला.

चांभाराची नजर जोड्यावर.

चुकलेला फकीर मशिदीत.

चोर सोडून संन्याशाला सुळी.

चोर तो चोर वर शिरजोर.

चोर नाही तर चोराची लंगोटी.

चोराच्या उलट्या बोंबा.

चोराच्या मनांत चांदणं.

चोराच्या वाटा चोरालाच माहीत.

चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे

चोरावर मोर.

चोरीचा मामला हळू हळू बोंबला.

छत्तीसाचा आकडा

जशास तसे.

जशी कामना तशी भावना.

जशी देणावळ तशी धुणावळ.

जशी नियत तशी बरकत.

जसा गुरु तसा चेला.

जसा भाव तसा देव.

जा‌ईचा डोळा नि आसवांचा मेळा.

जातीसाठी खावी माती.

जावयाचं पोर हरामखोर.

जिकडे पोळी तिकडे गोंडा घोळी.

जिकडे सु‌ई तिकडे दोरा.

जिच्या घरी ताक तिचे वरती नाक.

जेथे पिकतं तिथे विकतं नाही.

जो नाक धरी, तो पाद करी.

जो श्रमी त्याला काय कमी.

ज्याला नाही अक्कल त्याची घरोघरी नक्कल.

ज्वारी पेरली तर गहू कसा उगवणार?

झाकली मूठ सव्वा लाखाची

टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नही

तवा तापला तोवर भाकरी भाजून घ्यावी.

तेरड्याचा रंग तीन दिवस

तहान लागल्यावर आड खणणे.

ताकापुरते रामायण.

तोंड दाबून बुक्क्यांचा मार

तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले

दुष्काळात तेरावा महिना

दगडावरची रेघ

नाचता येईना अंगण वाकडे

नावडतीचे मीठ अळणी

नव्याचे नऊ दिवस

नाकापेक्षा मोती जड होणे

नाव मोठे लक्षण खोटे

पालथ्या घड्यावर पाणी

पायीची वहाण पायी बरी

पाण्यात राहून माशाशी वैर

पी हळद हो गोरी

बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर

भरंवशाच्या म्हशीला टोणगा

मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही

मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये

रात्र थोडी सोंगे फार

रंग गोरा पान आणि घरात गु घाण

रंग झाला फिका अन देईना कोणी मुका

रंगाने गोरी पण हजार गुण चोरी

लंकेत सोन्याच्या विटा

लाथ मारीन तिथे पाणी काढीन

लहान तोंडी मोठा घास

लग्न बघावे करून अन घर पाहावे बांधून

लवकर उठे, लवकर निजे त्याला आरोग्य संपत्ती लाभे

लाखाचे बारा हजार

लाखाशिवाय बात नाही अन वडापाव शिवाय काय खात नाही

वरातीमागून घोडे

वारा पाहून पाठ फिरवावी

वासरात लंगडी गाय शहाणी

शेरास सव्वाशेर

हपापाचा माल गपापा

You May Also Like

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *