Divaina Din Bahinabai Kavita

दिवाईना दिन धाबे धाबे दिवा
भाऊ कसा म्हणे मना बहीणना येवा

दिवाईन मुई नका फिरवा आत्याबाई
नवस्या बांधू म्हना घर किलवण्या जाई

दिवाईना दिन मनी थाटमा नथ
अशी ओवाई ऊन भाऊ तुन्ह धन भर गोत

दिवाई दसरा खोती बाडी ना पसारा
बंधू कसा म्हणे बहिनी दिवाई इसरा

दिवाईना दिन मना थाटमाना येल्या
अशी ओवाई ऊनी आयबा तूंना बोरस्याना गल्या

दिवाईना मुई वाट लई दे सासूबाई
भाऊ मना फिराले फिरी जाई माय मनी यमुना वाट पाहि

दिवाईना मुई वाट लई दया सासरा
मना भाऊले ओवयाले सन नाही रे दुसरा

सासू आत्याबाई पाय पडू द्या बागात
दिवाईना मुई भाऊ मना चालना रागात

दिवाईना दिन म्हणं ताट जड जड
बंधूनी टाका व्हई गोट पाटलीना जोड

दिवाईना दिन मना दंड्वर येल्या
अशी ओवाई उनी आयबा तुना बोरस्याना ग्ल्या

येरे येरे जेठा बंधू वाट तुन्ही रे देखस
सयबहिननी खुशाली दखी कयीज खुलस

ये रे ये रे बंधू सकाय दिवाईना सण
मायबापना भेटिले खतावन मन्ह मन

मायना हातनी सांजोरी कशी व्हटेवरी खावो
सण पाव्हणंले दादा महेर म्हानज राहो

सासू आत्याबाई उना मुऱ्हाई दारशे
काय रंधू मी भाऊले माहेराले जीव तरशे

बाप मुऱ्हई येईन गाडी खिल्लारी जोडीची
सण उना तोंडावर दिसे वाट माहेरची

मायनी ममतेने शेला ऊब माहेराला भेटे
याद माहेरनी येता आत हुंदक रे दाटे

कवी – बहिणाबाई चौधरी


View All Bahinabai Chaudhari Kavita

Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *